Join us   

पोट नीट साफ होत नाही; गॅसमुळे भूकही लागत नाही? तज्ज्ञ सांगतात १ उपाय- त्रास होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 3:52 PM

Constipation home remedies : अनेक दिवस पोट साफ नसणं गॅसचं लक्षण असतं. वेळीच या समस्येवर नियंत्रण ठेवलं नाही तर समस्या वाढू शकतो.

सध्या इंग्लिश टॉयलेटचा वापर खूप वाढलाय. आरामदायक रचना असल्यामुळे सर्वच घरांमध्ये हे टॉयलेट सिट्स बसवले जातात.  पण यामुळे कॉन्स्टिपेशन आणि मूळव्याधही होऊ शकतो. डायटिशियन मनप्रीय यांच्यामते पोट साफ होण्यासाठी नॅचरल स्थिती स्वाक्ट्स उत्तम आहे. (Constipation home remedies)   यामुळे रेक्टम सरळ राहते आणि प्लुबिक मसल्स रिलॅक्स होतात.

यामुळे मल बाहेर पडण्यास मदत होते. पण वेस्टर्न टॉयलेट्समध्ये ही स्थिती बिघडते आणि पोट साफ होण्यास त्रास होतो. अनेक दिवस पोट साफ नसणं गॅसचं लक्षण असतं. वेळीच या समस्येवर नियंत्रण ठेवलं नाही तर समस्या वाढू शकतो. तज्ज्ञांनी सांगितलेला डाएट प्लॅन गॅस, कॉन्स्टीपेशनची समस्या टाळण्यास  फायदेशीर ठरू शकतो. (Instant Indian Home Remedies for Constipation)

रिकाम्या पोटी प्या तुळशीचं पाणी

तुळशीच्या बियांमध्ये सोल्यूबल आणि इन्सॉल्यूबल फायबर्स  असतात. यामुळे पोट साफ होण्याची समस्या सोपी होते. सकाळी  रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात एक चमचा बीया घालून याचे सेवन केल्यास पोट साफ होतं.

अंजिर

अंजीरमध्ये फिसिनसारखे एन्झाइम असतात, जे नैसर्गिक रेचक म्हणून काम करतात. अंजिरमध्ये  फायबर आणि सॉर्बिटन असते, जे मल मऊ करून ते बाहेर टाकण्यास मदत करते. तुम्हीअंजीर रात्री भिजत ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी  खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होईल.

डिंक

डिंकाचं पाणी तब्येतीसाठी फायदेशीर ठरतं. यात सोल्यूबल फायबर्स असतात. यामुले मल मऊ होण्यास मदत होते. यात  सोल्यूबल फायबर्स असतात. यामुळे  मल सॉफ्ट होऊन बाहेर पडण्यात मदत होते. १ चमचा  डिंक पाण्यात भिजवून त्याचे सेवन करा.   

पोट,मागचा भाग जास्त वाढलाय? रोज रिकाम्यापोटी १ पदार्थ प्या, वितळेल पोटाची चरबी

भिजवलेले मनुके

रात्रभर भिजवलेले मनुके कॉन्स्टिपेशनवर  रामबाण उपाय आहेत. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. त्यातील फायबर मल मऊ करते आणि पचनशक्ती मजबूत करते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स