चांगल्या तब्येतीसाठी पचनक्रिया चांगली असणं गरजेचं असतं. शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी टॉक्सिन्स बाहेर पडणं गरजेचं असतं. पण सध्याच्या जीवनशैलीत गॅस, पोटाच्या संबंधित समस्या उद्भवतात. सकाळी व्यवस्थित पोट साफ झालं नाही तर दिवसभर चिडचिड होते. (Instant Indian Home Remedies for Constipation)
गॅसमुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही. कॉन्स्टिपेशनच्या त्रासानं अनेकदा डोकेदुखीसुद्धा होते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर अनेक उपाय आहेत. डायटिशियन राधिका गोयल यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How to make yourself poop)
गॅस दूर करण्याचे उपाय
गॅस दूर करण्यासाठी रात्री एक ग्लास दूध गरम करा. यात चमचा तूप घाला आणि झोपण्याआधी या दुधाचे सेवन करा. या उपायानं पोट साफ होण्यासाठी फायदे होतील. दूधात तूप मिसळून प्यायल्यानं गॅसची समस्या दूर होते. यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो. ज्या लोकांचे पोट सकाळी सहज साफ होत नाही किंवा रोज साफ होत नाही त्यांनी हा उपाय करायलाच हवा. यामुळे पचनक्रिया मजबूत होते.
ज्यांना गॅस, पोट फुगण्याची समस्या आहे किंवा ज्यांना लवकर अपचन होते त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. दूधात तूप मिसळून प्यायल्यानं शरीरातील एंजाईम्स रिलिज होतात त्यामुळे पचनक्रिया सुधारते. जर तुमच्या तोंडाला छाले पडण्याची समस्या असेल तर आवर्जून हे प्या.
दुधात तूप मिसळून प्यायल्याने झोपही चांगली लागते. रात्री सहज झोप येत नसेल तर ते प्यावे. सध्याच्या काळात, थकवा आणि कमकुवत राहणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. विशेषत: महिलांना या समस्येने जास्त त्रास होतो, अशा स्थितीत दुधात तूप मिसळून प्यायल्याने शक्ती मिळते.
१ आठवडा साखर सोडल्यास शरीरात कोणते बदल होतात? तज्ज्ञांनी सांगितले फायदेच फायदे
जर तुम्हाला सांधेदुखाचा त्रास जाणवत असेल तर दूधात तूप मिसळून प्या. यामुळे सांधे चांगले राहतात. सूज कमी होते. यात ओमेगा ३ आणि ६ फॅटी-एसिड्स असतात. दूधातील कॅल्शियम हाडांना मजबूती देण्यास फायदेशीर ठरतात. यामुळे पायांची सूजही कमी होते.
पोटाची चरबी कमी होता होत नाहीये? घरीच ५ मिनिटं हा व्यायाम करा, लवकर बारीक-सुडौल व्हाल
दूधात तूप मिसळून प्यायल्यानं अल्सर आणि एसिडीटीचा समस्या उद्भवत नाही. याशिवाय जळजळीचा त्रासही उद्भवत नाही. इम्यूनिटीसुद्धा मजबूत होते. आतड्यांच्या आरोग्यासाठी तूप फायदेशीर ठरते. वाढता ताण तणाव आणि प्रदूषणामुळे त्वचेचं बरंच नुकसान होतं. यामुळे त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडून चमक कमी होते. म्हणून दूधात तूप मिसळून लावल्यास फायदे मिळतात. १ चमचा दूधात मिसळून लावल्यानं त्वचेला फायदे मिळतात.