Join us

शुगर सतत वाढते? नाश्त्याला हा खास डोसा खा, कंट्रोलमध्ये राहील शुगर-आणि चवीलाही उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:08 IST

Insulin Friendly Dosa To Control Diabetes : डोशात प्रोटीन, फायबर्स मोठया प्रमाणात असतात. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.  

डायबिटीस (Diabetes)  एक गंभीर समस्या आहे ज्यावर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. जर तुम्ही योग्य  आहार घेतला तर शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये  ठेवू  शकता. ज्यामुळे दीर्घकाळ तब्येत चांगली राहते. डोशात प्रोटीन, फायबर्स मोठया प्रमाणात असतात. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.  ज्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. इंसुलिन रेजिस्टेंटसाठी उत्तम मानला जातो. हेल्थ एक्सपर्ट आयना सिंगला यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Insulin Friendly Dosa To Control Diabetes)

पौष्टीक  डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

१) काळे चणे  - अर्धा कप

२) चवळी - अर्धा कप

३) उडीदाची डाळ- अर्धा कप

४) तांदूळ- १ कप 

५) सोया चंक्स- अर्धा कप

६) मेथी दाणे -१ टिस्पून

७) पोहे - अर्धा कप

८) मीठ- गरजेनुसार

९) पाणी - गरजेनुसार

१०) तेल- गरजेनुसार

डोसा करण्याची योग्य पद्धत

काळे चणे, चवळी, तांदूळ आणि मेथी दाणे ८ तासांसाठी भिजवून ठेवा. पोहे वेगळे करून १५ मिनिटांसाठी भिजवून ठेवा. सोया चंक्सही भिजवून ठेवा. सर्व साहित्य एकत्र वाटून  एक पातळ बॅटर तयार करा. त्यात मीठ घालून ८ ते १०  तासांसाठी तसंच सोडून द्या. तव्यावर थोडं तेल घालून बॅटर घाला आणि डोसा कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्या. नंतर डोसा दही किंवा चटणीबरोबर खा.

डोसा खाण्याचे फायदे

हा डोसा प्रोटीन्सनी परीपूर्ण असतो. प्रोटीन्सच्या सेवनानं ब्लड शुगर लेव्हल स्थिर राहण्यास मदत होते. शरीरातील इंसुलिनचा प्रभाव वाढतो. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि ब्लड शुगर स्तर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.  इन्सुलिन रेजिस्टंटपासून बचाव होतो. याव्यतिरिक्त प्रोटीन्स फायबर्सनी परीपूर्ण असल्यामुळे बराचवेळ पोट भररलेलं राहतं. ज्यामुळे तुम्ही ओव्हरइटींग करत नाही, वजन नियंत्रणात राहते. ज्यामुळे इन्सुलिन रेजिस्टंट कमी करण्यास मदत होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.