Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > International Dance Day : नाचा आणि घालवा स्ट्रेस, डोक्याची कटकट आणि वाढलेले वजन कमी करायचे तर, रिसर्च सांगते..

International Dance Day : नाचा आणि घालवा स्ट्रेस, डोक्याची कटकट आणि वाढलेले वजन कमी करायचे तर, रिसर्च सांगते..

International Dance Day 2024: Weight loss to heart health : International Dance Day : डान्स केल्याने तणाव दूर होतो, आत्मविश्वास वाढतो, शरीरही तंदुरुस्त राहते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2024 10:00 AM2024-04-29T10:00:45+5:302024-04-29T10:05:01+5:30

International Dance Day 2024: Weight loss to heart health : International Dance Day : डान्स केल्याने तणाव दूर होतो, आत्मविश्वास वाढतो, शरीरही तंदुरुस्त राहते..

International Dance Day 2024: Weight loss to heart health | International Dance Day : नाचा आणि घालवा स्ट्रेस, डोक्याची कटकट आणि वाढलेले वजन कमी करायचे तर, रिसर्च सांगते..

International Dance Day : नाचा आणि घालवा स्ट्रेस, डोक्याची कटकट आणि वाढलेले वजन कमी करायचे तर, रिसर्च सांगते..

नृत्य (Dance) हा नेहमीच मानवी संस्कृतीचा, संस्कारांचा आणि उत्सवांचा भाग राहिला आहे (International Dance Day). २९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो (Health Tips). महान नृत्यांगना जीन-जॉर्जेस नवारेच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. नृत्य हे फक्त मनोरंजनासाठी नसून, याचे आरोग्याला मिळणारे फायदे मिळतात. शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय राहण्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी तणाव कमी करण्यासाठी मदत करते.

भारतात नृत्याचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक नृत्याची वेगवेगळी खासियत आहे. जर आपल्याला स्ट्रेस-फ्री आणि फिट राहायचं असेल तर, नृत्य हा एक उत्तम पर्याय आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की, नियमित नृत्य केल्याने शरीरात स्टॅमिना तर वाढतोच, शिवाय तणावही दूर होतो. ज्यामुळे मनाला शांती आणि आत्मविश्वासही वाढते(International Dance Day 2024: Weight loss to heart health).

रिसर्च काय सांगते..

- डेव्हलेपमेण्ट ऑर्गनायजेशन यॉर्कशायर डान्स आणि लीड्स विश्वविद्यालय यांच्या रिसर्चनुसार, 'जे लोक कोणत्या ना कोणत्या कलेमध्ये गुंतलेले असतात, ते तणावाला सहजपणे हाताळू शकतात.

- २ वर्षात पूर्ण झालेल्या या संशोधनात १० ते २० वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला आहे.

कमी वेळात बारीक व्हायचं? न चुकता '४' प्रकारचे पदार्थ नाश्त्याला खा; ढेरी घटेल - दिसाल फिट सुडौल

- त्या मुलांना विकली साप्ताहिक नृत्य विभागात समाविष्ट करण्यात आले असून, त्यानंतर त्यांची इन्फोर्मल मुलाखत घेण्यात आली, आणि पेपरद्वारे काही प्रश्न विचारण्यात आले.

- त्यांच्या प्रतिसादावरून असे दिसून आले की नृत्याच्या मदतीने त्यांचे पालक, समाज आणि शिक्षकांप्रती त्यांची वागणूक सुधारली आहे.

रिपोर्टच्या अहवालानुसार

- नृत्य केवळ तंदुरुस्त ठेवण्यात मदत करत नाही तर, एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी देखील मदत करते.

- नृत्य आपल्याला निर्णय घेण्याची शक्ती देते आणि तणावाशी लढण्यासाठी बळ देते. ज्यामुळे त्यांना आयुष्यात काहीतरी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते.

नृत्य करण्याचे फायदे

- फिजिकल ट्रेनर शिवनाथ सिंह सांगतात, मनोरंजनासोबतच डान्स एक स्ट्रेस बस्टर आहे. यातून केलेली कसरत शरीराला निश्चितच टोन करते.

- याशिवाय ताण, एकटेपणा आणि नैराश्य यासारख्या समस्याही दूर करतात.

कमी वेळात बारीक व्हायचं? न चुकता '४' प्रकारचे पदार्थ नाश्त्याला खा; ढेरी घटेल - दिसाल फिट सुडौल

- नृत्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. ज्यामुळे हाडं मजबूत होतात. शिवाय हाडांमध्ये कॅल्शियमचे योग्य प्रमाण राखण्यास मदत करते.

- नृत्य आपल्या हार्मोन्सवर नियंत्रण ठेवते.

- नियमित नृत्य केल्याने आपल्या शरीरातील १५० ते ५०० कॅलरीज बर्न होतात. मुख्य म्हणजे  झुंबा डान्स वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.

Web Title: International Dance Day 2024: Weight loss to heart health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.