Join us   

Iron Rich Food : अंगातलं रक्त वाढवून ५ आजारांपासून लांब ठेवेल हा पदार्थ; रोज खा, भाग्यश्रीच्या फिटनेस टिप्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 10:10 PM

Iron Rich Food : आलुबुखार आता सुपरफूडच्या श्रेणीत गणला जातो. अनेक अभ्यासांमध्ये आलुबुखार खाणं आरोग्यासाठी फायदेशीर फळ म्हणून वर्णन करण्यात आले आहे.

आपल्या आरोग्यासाठी फळे किती फायदेशीर आहेत हे आपणा सर्वांना माहित आहे. पण कोणत्या आजारात कोणते फळ खाणे जास्त फायदेशीर आहे, हे तज्ज्ञच सांगू शकतात. गरजेनुसार योग्य फळांची निवड केल्यास डॉक्टरांची फी वाचू शकते. चला तर मग जाणून घेऊया तज्ज्ञांकडून अशा फळाबद्दल जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच हाडांचे आरोग्य आणि अशक्तपणा दूर करण्यात मदत करते. (Actress cum nutritionist bhagyashree shared 5 amazing benefits of plum or aloo bukhara)

चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि पोषणतज्ञ भाग्यश्री पटवर्धन यांनी नुकताच इन्स्टा वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं आलूबुखार खाण्याचे फायदे सांगितले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, आलुबुखार आता सुपरफूडच्या श्रेणीत गणला जातो. अनेक अभ्यासांमध्ये आलुबुखार खाणं आरोग्यासाठी फायदेशीर फळ म्हणून वर्णन करण्यात आले आहे.

इम्यूनिटी चांगली राहते

अभिनेत्री आणि पोषणतज्ज्ञ भाग्यश्री आलूबुखार खाण्याचा सल्ला देते. याच्या सेवनाने तुमच्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते, असे तिचे म्हणणे आहे. एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातही याची पुष्टी झाली आहे. यानुसार आलुबुखारमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. अशा स्थितीत, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता. आलू बुखारमुळे हाडांशी संबंधित आजारांपासून मुक्ती मिळते. नियमितपणे याचे सेवन केल्याने आपण हाडं कमकुवत होणं टाळू शकता. 

ब्लड शुगर नियंत्रणात राहते

PubMed मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, आलुबुखारमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आणि फायबर असते, जे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करते. स्नॅक म्हणून तुम्ही सुकलेले आलुबुखार खाऊ शकता. यासोबतच भाग्यश्री रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ते खाण्याचा सल्लाही देते.

हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत नाही

हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तात आढळणारे प्रोटीन आहे. रक्तातील त्याच्या कमतरतेमुळे अॅनिमियासारखे आजार होतात. ज्याची कमतरता तुम्हाला थकव्यामुळे अशक्त बनवू शकते. अशा स्थितीत, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण पुरेसे राखण्यासाठी आलूबुखारचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

त्वचेसाठी फायदेशीर

आलूबुखारमध्ये  जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि कोलेजनसारखे घटक असतात, जे फ्रि रॅडिकल्सपासून तुमचे संरक्षण करतात. या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुम्हाला त्वचा आणि डोळ्यांचे नुकसान होण्याचा धोका असतो. अशा स्थितीत, आपण आपल्या आहारात आलुबुखारचा समावेश करून त्वचेच्या समस्यांना प्रतिबंध करू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य