Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लोह भरपूर असलेले ५ पदार्थ, हिमोग्लोबिन वाढून ब्लड सर्क्युलेशन सुधारेल; इम्युनिटीही होईल मजबूत!

लोह भरपूर असलेले ५ पदार्थ, हिमोग्लोबिन वाढून ब्लड सर्क्युलेशन सुधारेल; इम्युनिटीही होईल मजबूत!

Iron-Rich Foods: 5 Foods packed with Iron : शरीरात रक्ताची कमतरता भरून काढतील ५ पदार्थ-आतापासून खायला सुरुवात करा; कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2024 10:10 AM2024-03-05T10:10:10+5:302024-03-05T10:15:01+5:30

Iron-Rich Foods: 5 Foods packed with Iron : शरीरात रक्ताची कमतरता भरून काढतील ५ पदार्थ-आतापासून खायला सुरुवात करा; कारण..

Iron-Rich Foods: 5 Foods packed with Iron | लोह भरपूर असलेले ५ पदार्थ, हिमोग्लोबिन वाढून ब्लड सर्क्युलेशन सुधारेल; इम्युनिटीही होईल मजबूत!

लोह भरपूर असलेले ५ पदार्थ, हिमोग्लोबिन वाढून ब्लड सर्क्युलेशन सुधारेल; इम्युनिटीही होईल मजबूत!

आरोग्य हीच संपत्ती आहे. असे म्हटले जाते. ज्या व्यक्तीचे शरीर निरोगी असते, त्यांच्यात काहीही करण्याची ऊर्जा आणि क्षमता असते. त्याचवेळी वयानुसार शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते हे ही तितकेच खरं. त्यामुळे शरीरात पौष्टीक घटकांच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणे अजिबात योग्य नाही, असाच एक पोषक घटक म्हणजे लोह (Health Care). शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास रक्त पेशींचे उत्पादन कमी होते (Iron Rich Foods). ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडचण निर्माण होते. ज्यामुळे ही कमतरता ओळखून वेळीच आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

आयर्न शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते आणि शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आयर्नच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला ॲनिमियासारख्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आजपासून ५ पदार्थ खायला सुरुवात करा(Iron-Rich Foods: 5 Foods packed with Iron).

आवळा

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहासारखे गुणधर्म आढळतात. त्याचबरोबर त्यात असलेल्या आयर्नमुळे अॅनिमियामध्येही फायदेशीर मानले जाते. आपण आवळ्याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. आवळ्याचे लोणचे, कँडी, पावडर, मुरंबा इत्यादी पदार्थ खाऊ शकता. याशिवाय आवळा कच्चा किंवा उकडलेल्या स्वरूपातही खाऊ शकता.

रात्री 'या ' वेळी जेवण केले तर वजन घटणारच, वजन कमी करायचे तर पाहा जेवायची वेळ

मनुके

मनुक्यांमध्ये आयर्नसह कॉपर आणि व्हिटॅमिन्स आढळते. ज्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन योग्यरीत्या कार्य करते. जर आपण रात्रभर पाण्यात भिजवलेले मनुके सकाळी रिकाम्या पोटी खाल तर, त्याचा फायदा आरोग्यासह केस आणि त्वचेलाही होतो. मुख्य म्हणजे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

पालक

पालक हा अनेक पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. पालक स्नायूंच्या वाढीसाठी प्रभावी ठरते. आठवड्यातून फक्त दोनदा पालक खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पालकामध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि ई, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन तर सुधारतेच, शिवाय शरीरही सुदृढ राहते.

जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे

गुळ

दिवसभरात एक गुळाचा खडा खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. शिवाय शरीराला दिवसभरात लागणारी आयर्नची कमतरता भरून काढते. त्यात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्व बी, लोह आणि फॉस्फरस असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

Web Title: Iron-Rich Foods: 5 Foods packed with Iron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.