Join us   

कोण म्हणतं फक्त बिट खाऊन रक्त वाढतं? खा ‘हे’ ५ पदार्थ, हिमोग्लोबिन वाढेल लवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 5:23 PM

Iron-Rich Foods: 5 Foods packed with Iron - for good blood flow : रक्तात लोहाचे प्रमाण चांगले हवे, तरच तब्येत ठणठणीत

आजच्या धावपळीच्या जीवनातील प्रमुख आरोग्य समस्यांपैकी एक म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता (Haemoglobin). हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिने आहे, जे लाल रक्तपेशींमध्ये असते. यामुळे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन फ्लो व्यवस्थितरित्या कार्य करते (Blood Flow). जेव्हा हिमोग्लोबिनची पातळी कमी होते तेव्हा थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखीचा त्रास होतो (Health Tips).

विशेष म्हणजे महिला गर्भवती आहेत किंवा ज्यांना मासिक पाळी येत आहे किंवा ज्या महिला रजोनिवृत्तीमध्ये प्रवेश करणार आहेत, त्या महिलांना ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. लोहाच्या कमतरतेवर काही महिला मेडिसिन सुरु करतात. पण याव्यतिरिक्त आपण आहारातूनही आयर्न मिळवू शकता. अमेरिकन रेड ब्लड सोसायटीच्या अहवालानुसार कोणत्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात लोह आढळते याची माहिती देण्यात आली आहे(Iron-Rich Foods: 5 Foods packed with Iron - for good blood flow).

लोहाच्या कमतरता जाणवत असल्यास कोणते पदार्थ खावेत?

पालक

लोहाची कमतरता जाणवल्यास आहारात पालकाचा समावेश करा. हे ॲनिमियावर उपचार करण्यास मदत करते. पालक हे व्हिटॅमिन सी आणि फोलेटचा उत्तम स्त्रोत आहे. जे लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते.

तेलकट पदार्थ खाणे बंद करूनही वजन घटेना? ' हे ' ४ तेल स्वयंपाकासाठी वापरा, वजन वाढणारच नाही

बीटरूट

बीटरूट हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. यात लोहाचे प्रमाण जास्त असतेच, पण त्यात पोटॅशियम आणि फायबर तसेच फॉलिक ॲसिड देखील असते. यासाठी बीटरूटचा रस प्या किंवा त्याच्या पानांपासून भाजी तयार करून खा.

खजूर

खजुरामध्येही लोहाचे प्रमाण जास्त असते. यात लोह, मॅग्नेशियम, तांबे, जीवनसत्त्व हे पोषक घटक असते. आपण दिवसभरात दोन - तीन खजूर खाऊ शकता. यामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि लोहाची पातळीही वाढते.

दुधी भोपळा

अशक्तपणाचा त्रास असलेल्या लोकांसाठी दुधी भोपळा बेस्ट आहे. दुधी भोपळ्याचा रस किंवा भाजी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यात लोह आणि पोटॅशियम असते. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

रताळे

रताळ्याच्या अर्धा कप सर्व्हिंगमध्ये २.५ मिलीग्राम लोह असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आपण रताळे उकळून किंवा विविध पदार्थांमध्ये घालून खाऊ शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सभाज्याआरोग्य