स्वतःला फिट ठेवण्यासाठी बरेच लोक विविध गोष्ट करून पाहतात (Weight Loss). पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे सध्या लोकांचं रुटीन बिघडत चाललं आहे (Afternoon Nap). शरीर मेन्टेन ठेवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. जिममध्ये जाऊन घाम गाळणं असो किंवा योगासना. पण बऱ्याचदा नकळत घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरावर लवकर फरक दिसून येत नाही.
बऱ्याचदा वजन वाढण्यामागे हार्मोन्स देखील कारणीभूत ठरू शकतात. शिवाय झोपेचा परिणामही आपल्या वजनावर दिसून येतो. पण खरंच दुपारच्या झोपेमुळे वजन वाढू शकते का?(Is an afternoon nap good or bad for weight loss).
दुपारच्या वेळेत अधिक कॅलरीज होतात बर्न
हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, 'सकाळच्या तुलनेत दुपारच्या वेळेस झोपल्याने १० टक्के अधिक कॅलरीज बर्न होऊ शकतात. सकाळच्या तुलनेत दुपारी झोपल्याने शरीरातील उर्जा वाढू शकते. शिवाय दुपारची झोप घेतल्यानंतर मेटाबॉलिज्म बुस्ट होते. चयापचय क्रिया बुस्ट झाल्याने वजन घटण्यास मदत होते.
रोज चहा पिण्याची सवय घातक? त्यात घाला चिमुटभर 'ही' पांढरी गोष्ट; आरोग्य सुधारेल..
दिवसा किती तास झोपावं?
बऱ्याचदा दिवसभर झोप काढल्याने रात्रीच्या वेळेस झोप येणं कठीण जातं. अशावेळी दुपारच्या वेळेस झोपावं की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. जर आपल्याला दुपारच्या वेळेस झोप येत असेल तर, १५ ते ३० मिनिटांची झोप काढू शकता. बऱ्याचदा दुपारची झोप न मिळाल्याने थकवा, डोकेदुखी, यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. ही समस्या दूर करण्यासाठी आपण दुपारची झोप काढू शकता.
वेट लॉससाठी चपाती खाणे योग्य की भाकरी? तज्ज्ञ सांगतात, वजन कमी - त्वचेवर ग्लो हवा तर
अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढते?
२०१६ च्या स्लीप जर्नलच्या रिपोर्टनुसार, 'अपुऱ्या झोपेमुळे स्ट्रेसची समस्या वाढू शकते. स्ट्रेस वाढलं की, कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन वाढतो. हा हार्मोन घ्रेलीन नावाच्या संप्रेरकाच्या उत्पादनासाठी जबाबदार असतो. घ्रेलिन या हार्मोनला हंगर हार्मोन देखील म्हणतात, म्हणजेच शरीरात जितक्या जास्त प्रमाणात हा हार्मोन तयार होईल तितकी लोकांना जास्त भूक लागू शकते.
त्याच वेळी, अमेरिकन जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, झोपेच्या कमतरतेमुळे मेंदू अन्नाकडे अधिक आकर्षित होतो. त्यामुळे जे लोक कमी झोपतात. ते लोक अन्नाच्या लालसेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.