Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दारु न पिताही लिव्हर खराब होण्याचं १ महत्त्वाचं कारण, साधं फ्रूट ज्यूसही घातक कारण..

दारु न पिताही लिव्हर खराब होण्याचं १ महत्त्वाचं कारण, साधं फ्रूट ज्यूसही घातक कारण..

Is drinking fruit juice healthy fatty lever problem : कंबरेच्या भोवती चरबी जास्त प्रमाणात वाढली असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करायला हवी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2024 04:16 PM2024-10-08T16:16:47+5:302024-10-08T20:27:28+5:30

Is drinking fruit juice healthy fatty lever problem : कंबरेच्या भोवती चरबी जास्त प्रमाणात वाढली असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करायला हवी..

Is drinking fruit juice healthy fatty lever problem : 1 Major Cause of Liver Damage, Fruit Juice Easy to Drink, But... | दारु न पिताही लिव्हर खराब होण्याचं १ महत्त्वाचं कारण, साधं फ्रूट ज्यूसही घातक कारण..

दारु न पिताही लिव्हर खराब होण्याचं १ महत्त्वाचं कारण, साधं फ्रूट ज्यूसही घातक कारण..

फळांचा ज्यूस घेणे हे फळं चावून खाण्यापेक्षा सोपे असते. त्यामुळे बहुंताश जण फळांचा ज्यूस घेणे पसंत करतात. अगदी घरी नाही केला तर हॉटेलमध्ये मिळणारा फ्रूट ज्यूस किंवा टेट्रा पॅकमध्ये मिळणारा ज्यूस आवर्जून घेतला जातो. उपवासाच्या काळात, बाहेर उन्हात फिरताना किंवा लहान मुलांनाही हेल्दी म्हणून फ्रूट ज्यूस दिला जातो. पण फ्रूट ज्यूस चवीला चांगला लागत असला आणि पिणे सोपे असले तरी तो आरोग्यासाठी अजिबात चांगला नसतो. यामागचे कारण प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शाह-पांचाळ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून आपल्याशी शेअर करतात (Is drinking fruit juice healthy fatty lever problem). 

(Image : Google)
(Image : Google)

फ्रूट ज्यूसमध्ये असणारी साखर रक्तात अगदी सहज शोषली जाते. तिथून ती साखर आपल्या लिव्हरमध्ये जाते. मग लिव्हर यातील साखरेचे फॅटसमध्ये रुपांतर करते. इतकेच नाही तर हे फॅटस लिव्हरमध्येच स्टोअर होतात. ही गोष्ट सतत दर महिन्याला आणि मग वर्षानुवर्षे होत राहीली तर आपल्याला फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. आताच्या काळात अगदी १२ ते १५ वयाच्या लहान मुलांनाही फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. त्यामुळे अल्कोहोल न घेताही फॅटी लिव्हर कशी झाली असा प्रश्न जर आपल्याला पडत असेल तर त्यामागे हे महत्त्वाचे कारण असते हे लक्षात घ्यायला हवे. विशिष्ट प्रकारचे कार्बोहायड्रेटस अशाप्रकारे सतत घेत राहीलो आणि आपले काम बैठे असेल तर ठराविक काळाने आपल्याला फॅटी लिव्हरची समस्या उद्भवणार हे लक्षात घ्यायला हवे. 

फॅटी लिव्हर म्हणजे काय? 

(Image : Google)
(Image : Google)

फॅटी लिव्हरची कोणतीही लक्षणे नसतात. सोनोग्राफी झाल्याशिवाय आपल्याला कोणत्या स्टेजचा फॅटी लिव्हर प्रॉब्लेम आहे हे समजत नाही. एकदा लिव्हर खराब झाले की ट्रान्सप्लांटशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. तुमच्याही कंबरेच्या भोवती चरबी जास्त प्रमाणात वाढली असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन तुम्हीली फॅटी लिव्हरची समस्या नाही ना हे तपासून पाहायला हवे. ही समस्या पहिल्या ३ स्टेजमध्ये असेल तर आजार बरा होण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त तपासणी करणे आपल्या हातात आहे. एकदा स्टेज ३ च्या पुढे समस्या आहे असे लक्षात आले तर फारसे काही करता येत नाही.     


      

Web Title: Is drinking fruit juice healthy fatty lever problem : 1 Major Cause of Liver Damage, Fruit Juice Easy to Drink, But...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.