Join us   

जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर? नक्की किती आणि कधी पाणी पिणं चांगल्या पचनासाठी योग्य ठरतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2023 3:20 PM

Is drinking water during meals good or bad : जेवताना पाणी प्यावे की पिऊच नये? तज्ज्ञ काय सांगतात?

'जल है तो कल है' ही म्हण सर्वश्रुत आहे. पाण्यामुळे या धरतीतलावर प्रत्येक जीव जगतोय. शिवाय अन्नही तितकेच गरजेचं आहे. पण जेवताना पाणी न पिण्याचा सल्ला अनेकांनी आपल्याला दिला असेल. अनेकांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते. मात्र, ही सवय आरोग्यासाठी योग्य मानली जात नाही.

जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. पाणी प्यायल्याने पोटात असलेले अॅसिड पातळ होते. यामुळे पोटाचे विकार वाढतात. शिव्या पचनसंस्थाही कमकुवत होते. जेवताना किंवा जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात? जेवण केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे? जेवताना कोणी पाणी प्यावे?(Is drinking water during meals good or bad).

यासंदर्भात पोषणतज्ज्ञ रमिता कौर सांगतात, 'आयुर्वेदानुसार जेवताना पाणी पिऊ नये. यामुळे पोटाचे विकार वाढतात, व अन्नही लवकर पचत नाही. पण ज्यांची पचनसंस्था कमकुवत आहे, त्यांनी जेवणाच्यामध्ये पाण्याचे लहान घोट घेत अन्न चघळावे. यामुळे अन्न लवकर पचते.'

अरबट चरबट खाल्ल्यावर पोटदुखी, गॅसेसचा त्रास होतो? ओव्याचा एक जबरदस्त उपाय, काही मिनिटात मिळेल आराम

अन्न कसे पचते?

खरं तर अन्न तोंडात जाताच, ग्रंथी लाळ तयार करते. आपल्या लाळेमध्ये एंजाइम असतात जे अन्न तोडतात. यानंतर हे एंझाइम्स पोटातील आम्लीय जठराच्या रसात मिसळून जाड द्रव तयार करतात. हे द्रव पदार्थ लहान आतड्यांमधून जातात आणि पोषक द्रव्ये शोषून घेण्यास सुरवात करतात. पण जेवताना पाणी प्यायल्याने अन्न लवकर व्यवस्थित पचत नाही.

जेवताना पाणी का पिऊ नये?

जेवण पचवण्यासाठी पोटात असलेले अॅसिड आणि पाचक रस आवश्यक असतात. पाणी प्यायल्याने हे रस पातळ होतात, ज्यामुळे अन्न लवकर पचत नाही. यामुळे गॅसेस, पोट फुगणे, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पोटातील अन्न पचवण्यासाठी  अॅसिड आणि पाचक रस अवश्य असते. जेवताना पाणी प्यायल्याने पोषक तत्वांचे शोषण कमी होते. यामुळे शरीरात अशक्तपणा, थकवा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

दिवाळीपूर्वी वजन काम करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

वजन वाढू शकते

जेवताना पाणी प्यायल्याने वजन वाढण्याचा धोका वाढतो. जेव्हा आपण अन्न खातो आणि जेवताना फक्त पाणी पितो तेव्हा अन्नाचे पचन नीट होत नाही. अशा वेळी न पचलेल्या अन्नाचे फॅटमध्ये रूपांतर होते. त्यामुळे वजन वाढते. शिवाय वारंवार पाणी प्यायल्याने इन्शुलिनची पातळी वाढते. यामुळे शरीरात चरबी साठू लागते.

खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

बहुतांश आरोग्यतज्ज्ञ जेवल्यानंतर लगेच पाणी न पिण्याचा सल्ला देतात. खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानंतरच पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारते, शिवाय अन्नही लवकर पचते. पण ज्यांची पचनसंस्था कमकुवत आहे, त्यांनी जेवताना लहान पाण्याचा घोट घेत अन्न चघळावे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य