Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गव्हाच्या पिठाच्या तुलनेत मैदा लवकर पचतो? मैद्याचे सेवन चांगले की वाईट, न्यूट्रिशनिस्ट सांगतात..

गव्हाच्या पिठाच्या तुलनेत मैदा लवकर पचतो? मैद्याचे सेवन चांगले की वाईट, न्यूट्रिशनिस्ट सांगतात..

Is flour digested faster than wheat flour? Is flour consumption good or bad मैदा अजिबात चांगले नाही. असे अनेक जण म्हणतात. मात्र, मैदा लवकर पचते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2023 01:25 PM2023-01-31T13:25:14+5:302023-01-31T14:56:15+5:30

Is flour digested faster than wheat flour? Is flour consumption good or bad मैदा अजिबात चांगले नाही. असे अनेक जण म्हणतात. मात्र, मैदा लवकर पचते..

Is flour digested faster than wheat flour? Is flour consumption good or bad, say nutritionists.. | गव्हाच्या पिठाच्या तुलनेत मैदा लवकर पचतो? मैद्याचे सेवन चांगले की वाईट, न्यूट्रिशनिस्ट सांगतात..

गव्हाच्या पिठाच्या तुलनेत मैदा लवकर पचतो? मैद्याचे सेवन चांगले की वाईट, न्यूट्रिशनिस्ट सांगतात..

मानवाच्या मुलभूत गरजांमध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा हे तीन मुलभूत गरजा आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी व्यक्ती रात्रीचा दिवस एक करतो. काबाडकष्ट करून घरी धान्याचा साठा जमा करतो. गहू, ज्वारी, बाजरी व इतर धान्य मानवाला जगण्यासाठी आवश्यक आहे. जेवणामध्ये माणसाला चपाती ही लागतेच. काहींना चपाती शिवाय जमत नाही. काहींच्या घरात गव्हापासून चपाती तयार होते. तर, काहींच्या घरात मल्टीग्रेन रोटीचं सेवन केलं जातं.

सध्या तरुण वर्गात मैदापासून तयार पदार्थ खाण्याची सवयी लागली आहे. मैदा हा गव्हापासून तयार केला जातो. मात्र, मैदाला रिफाइंड पद्धतीने तयार केले जाते, त्यामुळे अधिक मैदा न खाण्याचा सल्ला दिला जातो.

मैदा हा गव्हाच्या पिठाचा रिफाइंड केलेला प्रकार आहे, ज्यामधून कोंडा आणि जंतू काढले जाते. या प्रक्रियेदरम्यान, गव्हातून अनेक पोषक घटक बाहेर पडतात. जे मानवी शरीराला उपयुक्त आहे. यामुळेच पांढऱ्या पिठाचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. मैद्यापासून तयार पदार्थ नियमित खाल्ल्याने लठ्ठपणाची समस्या उद्भवते. यासह टाईप 2 मधुमेह, हृदयविकार, बद्धकोष्ठता, सूज येणे आणि गॅस यांसारख्या पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

मैदा आरोग्यासाठी हानिकारक?

यासंदर्भात न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, ''पचनसंस्थेसाठी मैदा अजिबात चांगले नाही. असे अनेक जण म्हणतात. मात्र, मैदा लवकर पचते, याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. मैद्याच्या तुलनेत गव्हाचं पीठ हळू पचते. ज्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आणि अधिक पोषक घटक आहेत.

मैदा पोटात किंवा आतड्यात जाऊन जमा होते आणि ते सहज पचत नाही, असा समज अनेक भारतीय लोकांमध्ये आहे. कारण मैदा साखरेप्रमाणे लवकर पचते. यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक मानले गेले आहे. उच्च फायबर असलेले अन्नपदार्थ हळूहळू पचतात, म्हणून कोणतेही संपूर्ण धान्य (जसे पीठ) रिफाइंड पिठाच्या तुलनेत हळू पचते. मैदा पचायला सोपे आहे, मात्र, मैदा रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते, त्यामुळे त्याचे अतिसेवन टाळावे.

Web Title: Is flour digested faster than wheat flour? Is flour consumption good or bad, say nutritionists..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.