Join us   

ऐन तारुण्यात नजर धुसर-चष्मा लागला? तुपात ‘हा’ पदार्थ कालवून खा, डोळे सांभाळा..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 9:12 PM

Is Ghee Good For Eyes : तूप भारतीय स्वंयपाक घरातील एक महत्वाचा घटक आहे.

आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये गॅजेट्सचा वाढता वापर आणि दिवस रात्र मोबाईल, लॅपटॉपमध्ये घुसून राहिल्यामुळे डोळ्यांमुळे चुकीचा परिणाम होत आहे. (Eye Care Tips Is Ghee Good For Eyes) ज्यामुळे अनेकांची डोळ्यांची दृष्टी कमी होत आहे. कमी वयात डोळे कमकुवत होणं अनेक आजारांचे  कारण ठरू शकते. एकदा डोळ्यांची रोशनी कमी झाली तर पुन्हा नजर चांगली करण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्स घ्याव्या लागतात. दृष्टी चांगली ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करू शकता. (Is Ghee Good For Eyes)

अधुनिक जीवनशैली, दीर्घकाळ स्किनचा उपयोग, अन्हेल्दी डाएट आणि ताण-तणाव यांमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आयुर्वेद आणि घरगुती उपायांमध्ये काही खास प्राकृतिक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यातीलच एक म्हणजे तूप आणि काळ्या मिरीचे मिश्रण आयुर्वेदात एक प्रभावी उपाय आहे.

दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा, नसांनसांत भरेल ताकद-कंबरदुखी टळेल

एमएम चोकसी आय हॉस्पीटलच्या रिपोर्टनुसार नेत्रविकारतज्ज्ञ सांगतात की, तुम्ही दैनंदिन आहारात गाईचे तूप वापरू शकता. ज्यामुळे मेंदूचा विकास आणि दृष्टीचा विकास होण्यास मदत होते. रोजच्या आहारात तुपाचा समावेश केल्यास डाएट सुधारते आणि आयसाईट सुधारण्यास मदत होते. तूप भारतीय स्वंयपाक घरातील एक महत्वाचा घटक आहे (Ref). यात व्हिटामीन ए, डी, ई आणि के असते. ज्यामुळे शरीरातील पोषणातील कमतरता दूर होते आणि सेल्सच्या विकासात मदत होते. तूपचा वापर फक्त स्वंयपाकात केला जात नाही तर आयुर्वेदीक उपचारांमध्येही खास महत्व दिले गेले आहे. 

काळी मिरीची उपयोग आयुर्वेदात एक औषधी मसाल्यांच्या स्वरूपात केला जातो. यात पिपेरिन नावाचे तत्व असते ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. शरीराची इम्यूनिटी वाढते आणि पोषक तत्वांचे अवशोषण होण्यास मदत होते. व्हिटामीन ए डोळ्यांसाठी महत्वाचे असते. यामुळे रेटीनाचची कार्यक्षमता वाढते आणि नाईट ब्लाईंडनेसपासून बचाव होतो.

गव्हाच्या डब्यात पोरकिडे-अळ्या दिसतात? गव्हात किचनमधले ५ पदार्थ ठेवा; वर्षानुवर्ष किड लागणार नाही

तुपात व्हिटामीन ए असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.   काळ्या मिरीत एंटी ऑक्सिडेंट्स गुण असतात जे फ्री रेडिकल्सपासून लढण्यास मदत करतात. फ्रि रेडीकल्स डोळ्यांच्या पेशींना नुकसान पोहोचवू शकतात. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते. काळ्या मिरीचे सेवन केल्यानं हानीकारक तत्वांपासून बचाव होतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स