भारतातील बहुतांश व्यक्तींना मधुमेह हा आजार आहे. मधुमेह हा एक सायलेंट किलर आजार आहे, ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. यामध्ये रक्तातील साखर वाढू लागते, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या सुरू होतात. मधुमेहग्रस्त रुग्ण साखर नियंत्रणात ठेवून निरोगी आयुष्य जगू शकतात. यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचं आहे. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यापैकी पेरू खूप फायदेशीर ठरू शकते.
पेरू चविष्ट असण्यासोबतच, त्यात ते सर्व गुणधर्म आणि पोषक तत्व आढळतात, जे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. डिटॉक्सप्रीच्या संस्थापक आणि होलिस्टिक न्यूट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर यांच्या मते, ''जर आपल्याला हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवायचं असेल, तर पेरूचा आहारात समावेश करा. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले हे फळ, मधुमेह नियंत्रित करण्यासाठी मदत करते''(Is Guava Good for Diabetes | Check Top Benefits).
टाइप २ मधुमेह राहते नियंत्रणात
पेरूमध्ये भरपूर प्रमाणात लोह, फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. हे सर्व घटक विशेषत: टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात. पेरूच्या सेवनाने रक्तातील साखर प्रभावीपणे नियंत्रित करता येते.
लिंबू जास्त खाल्ल्याने खरेच वजन कमी होते का? लिंबू आहारात किती असावा?
वेट लॉस करण्यासाठी फायदेशीर
पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. दिवसातून एक पेरू खाल्ल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे आपण उलट - सुलट खाणं टाळतो. वजन नियंत्रित करणे हे मधुमेह नियंत्रित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
रक्तदाब नियंत्रणात राहतो
पेरूचे गुणधर्म रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.
पचनसंस्था सुधारते
पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, आणि फायबर पचन सुधारण्यास मदत करते. मधुमेही रुग्णांसाठी पचनक्रिया उत्तम राखणे महत्त्वाचे आहे. कारण अन्नपदार्थांचे योग्य पचन रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.
आवडतात म्हणून एकावेळी ४-५ गुलाबजाम खाता? पण विचार करा, एका गुलाबजाममध्ये किती कॅलरी असतात?
पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी पेरू हा एक सर्वोत्तम फळ आहे. कारण पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स स्कोर १२-२४ आहे. शिवाय, १०० ग्रॅम पेरूमध्ये फक्त 8.92 ग्रॅम साखर असते.
डायबिटिज रुग्णांनी पेरू कसा खावा
मधुमेहग्रस्त रुग्णांनी नाश्त्यात ताजे पेरू खावेत. आपण पेरूसोबत ड्रायफ्रुट्स देखील खाऊ शकता. आपण पेरू सॅलडमध्ये मिक्स करून खाऊ शकता. यासह स्मूदी देखील बनवून पिऊ शकता.