Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज सायंकाळी चहा पिता? आरोग्यासाठी अतिशय त्रासदायक कारण...

रोज सायंकाळी चहा पिता? आरोग्यासाठी अतिशय त्रासदायक कारण...

Is it bad to drink tea in evening? चहा प्या, पण संध्याकाळी चहा पिताना थोडं विचार करा, आरोग्यावर होतील गंभीर परिणाम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2023 05:55 PM2023-05-01T17:55:45+5:302023-05-01T17:58:15+5:30

Is it bad to drink tea in evening? चहा प्या, पण संध्याकाळी चहा पिताना थोडं विचार करा, आरोग्यावर होतील गंभीर परिणाम..

Is it bad to drink tea in evening? | रोज सायंकाळी चहा पिता? आरोग्यासाठी अतिशय त्रासदायक कारण...

रोज सायंकाळी चहा पिता? आरोग्यासाठी अतिशय त्रासदायक कारण...

चहा हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. चहाशिवाय अनेकांची सकाळ होत नाही. सकाळ असो किंवा संध्याकाळ, उन्हाळा असो किंवा पावसाळा, वेळेला चहा हा लागतोच. चहाप्रेमी आपल्याला अनेक ठिकाणी सापडतील. सायंकाळ झाली की त्यांच्यामध्ये चहा पिण्याची तलब वाढते. आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांच्या मते, ''सुमारे 64% भारतीयांना दररोज चहा प्यायला आवडते, तर 30% पेक्षा जास्त लोकांना सायंकाळच्या वेळी चहा पिण्याची इच्छा होते. किंवा ते सकाळी रिकाम्या पोटी चहा पितात. मात्र, ही बाब आरोग्यासाठी घातक मानली जाते.''

त्यामुळे सायंकाळच्या वेळी चहा प्यावं की टाळावं? संध्याकाळी चहा प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते का? यासंदर्भात, त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माहिती शेअर केली आहे(Is it bad to drink tea in evening?).

संध्याकाळी चहा प्यावं की नाही?

डॉ. दीक्षा यांच्या म्हणण्यानुसार, '' झोपण्याच्या १० तास आधी कॅफिनयुक्त पदार्थ टाळावे. हे यकृत डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते, कोर्टिसोल कमी करते आणि निरोगी पचनक्रिया करण्यास मदत करते. पण संध्याकाळी कोणी चहा प्यावं कोणी टाळावं, हे त्यांच्या वैयक्तिक कारणांवर आणि विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींवर अवलंबून आहे.''

संध्याकाळी कोण चहा पिऊ शकतं?

- जे लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात.

- ज्यांना अॅसिडिटी किंवा गॅस्ट्रिकचा त्रास होत नाही.

- ज्यांची पचनसंस्था निरोगी आहे.

- ज्यांना चहाचे व्यसन नाही.

वाढलेले वजन, सुटलेले पोट यावर १ उत्तम घरगुती उपाय, जिरे - बडीशेप पावडर - बघा करून..

- ज्यांना झोपेची समस्या नाही.

- जे दररोज वेळेवर जेवतात.

- जे अर्धा किंवा १ कप चहापेक्षा कमी चहा पितात.

संध्याकाळी चहा पिणे कोणी टाळावे?

- ज्यांना झोपेची किंवा निद्रानाशाची समस्या आहे.

- जे चिंताग्रस्त आणि तणावपूर्ण जीवन जगतात.

- ज्यांना वातेचा त्रास जास्त आहे.

- ज्यांना वजन वाढवायचे आहे.

- ज्यांना कमी भूक लागते.

काकडी टोमॅटो एकत्र एकवेळी खाणे पचनाला त्रासदायक असते का? तज्ज्ञ सांगतात, योग्य काय..

- ज्या लोकांना हार्मोनल समस्या आहेत.

- ज्यांना बद्धकोष्ठता / ऍसिडिटी किंवा गॅसची समस्या आहे.

- मेटाबॉलिक व ऑटो-इम्यूनग्रस्त रुग्णांनी टाळावे.

- ज्यांचे वजन कमी आहे.

- ज्यांना स्किन, केस व आतड्यांना हेल्दी ठेवायचे आहे.

Web Title: Is it bad to drink tea in evening?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.