Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दुपारी जेवण झालं की झोप येते, डुलक्या सुरू? हे चांगलं की वाईट? डॉक्टर सांगतात...

दुपारी जेवण झालं की झोप येते, डुलक्या सुरू? हे चांगलं की वाईट? डॉक्टर सांगतात...

Is it fine for good health to sleep in the afternoon or day time : दिवसा झोपण्याचे आरोग्यावर होणारे गंभीर परीणाम वेळीच लक्षात घ्यायला हवेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 12:39 PM2023-12-25T12:39:39+5:302023-12-25T12:44:33+5:30

Is it fine for good health to sleep in the afternoon or day time : दिवसा झोपण्याचे आरोग्यावर होणारे गंभीर परीणाम वेळीच लक्षात घ्यायला हवेत...

Is it fine for good health to sleep in the afternoon or day time : Do you fall asleep after eating in the afternoon, do you start napping? Is this good or bad? Doctor says... | दुपारी जेवण झालं की झोप येते, डुलक्या सुरू? हे चांगलं की वाईट? डॉक्टर सांगतात...

दुपारी जेवण झालं की झोप येते, डुलक्या सुरू? हे चांगलं की वाईट? डॉक्टर सांगतात...

रात्री कितीही चांगली झोप झाली तरी अनेकदा आपल्याला दुपारी डुलक्या येतात. थंडीच्या दिवसांत तर दुपारी जेवण झालं की तर खूप झोप यायला लागते. अशाप्रकारे दिवसा झोप येण्यामागे अनेक कारणे असतात. रात्रीचे जागरण, थकवा, आळस यांमुळे अशी झोप येऊ शकते. ऑफीसमध्येही अनेकदा आपल्याला दुपारी असह्य झोप येते आणि आपण डेस्कवर डोकं टेकवून डुलकी काढतो. सुट्टीच्या दिवशी किंवा नेहमी घरात असणारे तर दुपारी हमखास झोप काढतातच. पण असं दुपारी झोपणं योग्य की नाही हे आपल्याला समजत नाही. अशाप्रकारे दिवसा झोपण्याचा आरोग्यावर काय परीणाम होतो याबाबत डॉ. जयदिप रेवाळे काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात. पाहूयात डॉक्टर नेमकं काय सांगतात (Is it fine for good health to sleep in the afternoon or day time)...

१. दुपारी थोडासा आराम करणे योग्य आहे. पण हा आराम म्हणजे १५ ते २० मिनीटांचा आराम असायला हवा. यालाच आपल्याकडे वामकुक्षी असेही म्हटले जाते. 

२.  मात्र दुपारी २ ते ३ तास गाढ झोपणे आरोग्यासाठी योग्य नाही. अर्धा तास किंवा त्याहून जास्त वेळ झोपण्याची सवय असेल तर त्यामुळे मधुमेह, हृदयविकार यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.  

 

३. दुपारचा आराम करणे म्हणजे १५ ते २० मिनीटांसाठी संगीत ऐकणे, डोळे मिटून बसून राहणे, शक्य असेल तर पाठ टेकून १५ मिनीटे पडणे, वाचन करणे असे मनाच्या आणि शरीराच्या आरामाशी निगडीत काहीतरी करायला हवे. 

Web Title: Is it fine for good health to sleep in the afternoon or day time : Do you fall asleep after eating in the afternoon, do you start napping? Is this good or bad? Doctor says...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.