Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डायबिटीस असेल तर दूध प्यावं का? संशोधक सांगतात, वाढलेली शुगर आणि दूध पिण्या-न पिण्याचे होणारे फायद-तोटे

डायबिटीस असेल तर दूध प्यावं का? संशोधक सांगतात, वाढलेली शुगर आणि दूध पिण्या-न पिण्याचे होणारे फायद-तोटे

Is it Fine To Have Milk In Diet If You Have Diabetes : रक्तातील साखर आणि दूध यांचा नेमका काय संबंध असतो याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2023 04:14 PM2023-02-23T16:14:03+5:302023-02-23T17:31:01+5:30

Is it Fine To Have Milk In Diet If You Have Diabetes : रक्तातील साखर आणि दूध यांचा नेमका काय संबंध असतो याविषयी...

Is it Fine To Have Milk In Diet If You Have Diabetes : Should people with diabetes have milk in their diet? Researchers say when to drink, how much to drink... | डायबिटीस असेल तर दूध प्यावं का? संशोधक सांगतात, वाढलेली शुगर आणि दूध पिण्या-न पिण्याचे होणारे फायद-तोटे

डायबिटीस असेल तर दूध प्यावं का? संशोधक सांगतात, वाढलेली शुगर आणि दूध पिण्या-न पिण्याचे होणारे फायद-तोटे

दूधामध्ये प्रोटीन असतं, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आहारात दुधाचा समावेश अवश्य करायला हवा असं आपण नेहमी ऐकतो. लहान मुलांना तर जन्मापासून आपण दूध हाच मुख्य आहार म्हणून देतो. बरेचदा ताकद कमी असणाऱ्यांना किंवा कॅल्शियमची कमतरता असलेल्यांना डॉक्टर दूध आवर्जून प्यायला सांगतात. यासोबतच दुधापासून तयार झालेले दही, ताक, लोणी, तूप, पनीर, चीज असे पदार्थही आपण आहारात आवर्जून घेतो. मात्र डायबिटीस असणाऱ्यांसाठी दूध आणि दुधाचे पदार्थ कितपत उपयुक्त असतात. याबाबत मात्र आपल्याला पुरेशी माहिती असतेच असे नाही. दूधामध्ये असणारे फॅटस शुगर असणाऱ्या व्यक्तींसाठी घातक ठरु शकतात. मात्र त्यातील प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. मग डायबिटीस असणाऱ्यांनी दूध घ्यावे की नाही (Is it Fine To Have Milk In Diet If You Have Diabetes) ? 

कोणते दूध जास्त चांगले? 

एका अभ्यासानुसार डायबिटीस रुग्णांना दूध प्यायचे असेल तर त्यांनी फॅटस नसलेले दूध प्यायला हवे. तसेच प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते त्यामुळे दूध घेतल्यानंतर डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासायला हवी. दुधाचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परीणाम होतो ते यामुळे समजण्यास मदत होईल. 

(Image : Google)
(Image : Google)

डायबिटीस असणाऱ्यांनी किती दूध घेतले तरी चालते? 

डायबिटीस असेल किंवा नसेल तरीही कोणीच १ ग्लासशिवाय जास्त दूध घेऊ नये. डायबिटीस ऑर्गनायजेशनच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीने दररोज १९० मिलीलीटरहून जास्त दूध घेणे योग्य नाही. तापवलेले म्हणजेच साय काढलेले दूध तसेच साखर किंवा इतर कोणत्याही गोष्टी न मिसळता दूध घेण्यास हरकत नाही.  

(Image : Google)
(Image : Google)

दुधाची इतर उत्पादने घ्यावीत का? 

दूध आणि दुधाच्या इतर पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे ही उत्पादने डायबिटीस असणाऱ्यांनी घेण्यास हरकत नाही. यामध्ये असणारे प्रोटीन आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने पनीर, दही, ताक यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश असायला हवा. 

Web Title: Is it Fine To Have Milk In Diet If You Have Diabetes : Should people with diabetes have milk in their diet? Researchers say when to drink, how much to drink...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.