जगभरातील प्रत्येक व्यक्ती हेल्दी आणि फिट राहण्याच्या प्रयत्नात असतो. वेळेच्या वेळी खाण्यापासून, झोपेपर्यंत सगळ्याच गोष्टींची काळजी घेतली जाते. (Drinking Water Before Bed) काहीजण २० ते ३० मिनिटं व्यायामही करतात. निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी खाण्यापिण्याबरोबरच व्यायाम करणंही गरजेचं असतं. रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Is it good to drink water before sleeping at night)
प्रत्येकाने भरपूर पाणी प्यायला हवं जेणेकरून शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही आणि शरीर डिटॉक्स होईल. पाणी पिण्याच्या वेळेबाबत हेल्थ एक्सपर्ट्स आणि संशोधक वेगवेगळे सल्ले देतात. काहीजण म्हणतात झोपण्याआधी कमी पाणी प्यायचं तर काहीजण जास्त पाणी पिण्यास सांगतात. रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं कितपत योग्य ठरतं ते पाहूया.(How Drinking Water Before Bed Impacts Sleep)
१) रात्री पाणी प्यायल्यानं शरीर डिटॉक्सीफाय आणि क्लिन होते. रात्री जेवल्यानंतर अर्धा तास आधी किंवा झोपण्याच्या १ ते २ तास आधी पाणी प्यायल्यानं डायजेशन व्यवस्थित होते आणि सकाळी फ्रेश वाटतं. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.
खुद्द माधुरी दीक्षित सांगतेय खास तिच्या स्किन केअर टिप्स; चेहऱ्यावर चमक आणि केस सुंदर!
२) दिवसभरात तुम्ही जे काही खाता ते रात्रीच्यावेळेस पचते. तर तुम्ही रात्री झोपण्याच्या २ तास आधी पाणी प्यायलात तर जेवणातील पोषक तत्व अवशोषण होऊन उर्जेत बदलतील आणि मेटाबॉलिझ्म मजबूत होऊन गॅसची समस्या टाळण्यास मदत होईल.
दूध घालून अजिबात खाऊ नयेत असे ७ पदार्थ, पोट बिघडेल-पडाल आजारी!
३) रात्री झोपण्याआधी पाणी न पिता रात्री झोपण्याच्या दीड ते २ तास आधी पाणी प्यावं. यामुळे शरीराला पुरेपूर फायदा मिळतो. म्हणून झोपण्याआधी जास्त पाणी न पिता २ ते ३ तास आधीच पाणी प्यावे.
४) रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्यानं शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ राहते. पचनक्रिया चांगली राहते याशिवाय आजारांपासून लांब राहण्याची क्षमता वाढते.
५) एक्सपर्ट्सच्यामते डायबिटीस पेशंट, किडनी आणि मायग्रेनचा रात्र असल्यांनी रात्री जास्त पाणी पिऊ नये. कारण रात्री झोप पूर्ण करणं गरजेचं असतं. जास्त पाणी प्यायल्याने सतत लघवीसाठी उठावं लागू शकतं ज्यामुळे झोप मोड होते.