Join us   

शिळी चपाती फेकू नका, थंड दुधासोबत कुस्कुरून खा, वजन होईल कमी, ब्लड शुगरही राहील नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2023 12:03 PM

Is it good to eat roti and milk together : शिळी चपाती खाण्याचे माहीत नसलेले फायदे वाचाल, तर कधी फेकून देण्याची चूक आपण करणार नाही

अनेकदा रात्रीचं जेवण केल्यानंतर अन्न उरते. काही जण अन्न फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवतात. बऱ्याचदा चपाती उरते. परंतु, उरलेली चपाती खाताना अनेक जण नाकं मुरडतात. काही जण शिळी चपाती फेकून देतात, किंवा गाय तसेच मांजरींना खाऊ घालतात. पण शिळी चपाती खाण्याचे अनेक फायदे आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? शिळी चपाती दुधासोबत खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये थंड दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅस, रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आरोग्याच्या निगडीत समस्यांवर प्रभावी ठरते.

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट संध्या गुगनानी सांगतात, 'चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामध्ये व्हिटॅमिन बी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे चपाती १२ ते १५ तासानंतर खाल्ल्याने आरोग्यावर कोणतेही वाईट परिणाम होत नाही'(Is it good to eat roti and milk together?).

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

सकाळच्या नाश्त्यामध्ये थंड दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने, उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी शिळी चपातीवर तूप किंवा तेल लावून शेकून घ्या. नंतर वाटीभर दुधात शिळी चपाती १० मिनिटांसाठी कुस्कुरून ठेवा. १० मिनिटानंतर नाश्ता म्हणून खा. त्यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.

वाढत्या वजनापुढे हतबल आहात? रात्री झोपताना कोमट पाण्यात ‘हा’ चिमूटभर पदार्थ घालून प्या, फॅट्स होतील गायब

पोटाचे विकार दूर होतात

झोपण्यापूर्वी डिनरमध्ये देखील आपण दुधासोबत शिळी चपाती खाऊ शकता. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी आणि पोट फुगणे अशा अनेक त्रासापासून सुटका मिळते.

मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी प्रभावी

शिळी चपाती मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. आपण दुधासोबत शिळी चपाती नाश्त्यामध्ये किंवा डिनरमध्येही खाऊ शकता.

पोटाची चरबी, कंबरेच्या वाढलेल्या घेरामुळे त्रस्त आहात? रोज खा ५ पैकी एकतरी भाजी, पोट होईल सपाट

वेट लॉससाठी मदत

शिळ्या चपातीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे वजन कमी करण्यास मदत करतात. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे भूक लगेच लागत नाही. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्नवेट लॉस टिप्समधुमेह