Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कांदाभजी- समोसा-वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हालाही १ कप कडक चहा प्यायला आवडतं? मग हे तातडीनं वाचा..

कांदाभजी- समोसा-वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हालाही १ कप कडक चहा प्यायला आवडतं? मग हे तातडीनं वाचा..

Is It Good To Have Tea With Pakoda Or Any Other Snacks?: पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम खमंग कांदाभजी, समोसा आणि चहा अशा मेन्यूवर तुम्हीही ताव मारत असाल तर हे एकदा वाचाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 03:59 PM2024-06-26T15:59:46+5:302024-06-26T18:44:02+5:30

Is It Good To Have Tea With Pakoda Or Any Other Snacks?: पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम खमंग कांदाभजी, समोसा आणि चहा अशा मेन्यूवर तुम्हीही ताव मारत असाल तर हे एकदा वाचाच..

is it good to have tea with pakoda or any other snacks? tea with pakoda is healthy, side effects of having tea with pakoda or namkeen | कांदाभजी- समोसा-वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हालाही १ कप कडक चहा प्यायला आवडतं? मग हे तातडीनं वाचा..

कांदाभजी- समोसा-वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हालाही १ कप कडक चहा प्यायला आवडतं? मग हे तातडीनं वाचा..

Highlights हे सगळं आपल्या जिभेसाठी उत्तम असलं तरी ते शरीरासाठी नेमकं कसं आहे, याविषयी बघा तज्ज्ञ काय सांगतात...

उन्हाळा संपून आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. सुरुवातच असल्याने अजून म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. पण लवकरच धो धो पावसाला सुरुवात होईल आणि मग पावसाळी मेन्यू आपल्याला खुणावू लागतील. त्या मेन्यूपैकीच एक अतिशय लोकप्रिय पदार्थ म्हणजे कांदा भजी आणि चहा... हे दोन पदार्थ खवय्यांसाठी ऑल टाईम फेव्हरेट. काही जण कांदा भजी खात खात चहा घेतात तर काही जण कांदा भजी संपवल्यानंतर चहाचा आनंद घेतात (is it good to have tea with pakoda or any other snacks?). फक्त पावसाळ्यातच नाही, तर एरवीही अनेक जण सामोसा, वडापाव असे स्नॅक्स खाल्ल्यानंतर चहाचा आस्वाद घेतात (tea with pakoda is healthy?). हे सगळं आपल्या जिभेसाठी उत्तम असलं तरी ते शरीरासाठी नेमकं कसं आहे, याविषयी बघा तज्ज्ञ काय सांगतात...(side effects of having tea with pakoda or namkeen)

 

काही आहारतज्ज्ञांच्या मते चहासोबत कोणताच पदार्थ खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. तोच नियम कांदाभजी, सामोसे, वडापाव यांनाही लागू होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या पदार्थासोबत चहा पिता किंवा एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच चहा पिता, तेव्हा चहामधलं टॅनिन तुमच्या शरीरात जातं. या टॅनिनमुळे तुम्ही जो कोणता पदार्थ खाल्ला आहे, त्याच्या पचनामध्ये बाधा येते आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो. पचन, चयापचय व्यवस्थित झालं नाही, तर त्यामुळे अनेकांना ॲसिडीटी, गॅसेस, कॉन्स्टीपेशन असा त्रास होतो. त्यामुळे चहासोबत शक्यतो काहीही खाऊ नका.

 

काही आहारतज्ज्ञ असंही सांगतात की पावसाळ्याच्या दिवसांत आधीच आपली पचनशक्ती मंद झालेली असते. त्यात जर आपण तेलकट किंवा बेसनाचे पकोडे, वडे असे पदार्थ खाल्ले तर ते आधीच पचायला जड जातात. त्यात पुन्हा चहा घेतला तर पचनक्रिया अधिकच मंदावते. यामुळे मग पावसाळ्यात पाेटाचा त्रास वाढू शकतो. म्हणूनच तुम्हाला हे कॉम्बिनेशन कितीही आवडत असलं तरी थोडा धीर धरा आणि  काही खाल्ल्यानंतर कमीतकमी अर्ध्या तासानेच चहा प्यावा, असं आहारतज्ज्ञ सांगतात. 

 

Web Title: is it good to have tea with pakoda or any other snacks? tea with pakoda is healthy, side effects of having tea with pakoda or namkeen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.