Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुम्हीही थेट गॅसवर पोळी-भाकरी भाजता? हे आरोग्यासाठी चांगले की वाईट, आहारतज्ज्ञ सांगतात...

तुम्हीही थेट गॅसवर पोळी-भाकरी भाजता? हे आरोग्यासाठी चांगले की वाईट, आहारतज्ज्ञ सांगतात...

is it healthy to do fulke or bhakri on gas directly without tawa-do know Scientific reason behind the same : थेट गॅसवर भाजलेल्या पदार्थांचा आरोग्याला खरंच त्रास होतो का याबाबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 09:35 AM2023-12-27T09:35:25+5:302023-12-27T09:40:01+5:30

is it healthy to do fulke or bhakri on gas directly without tawa-do know Scientific reason behind the same : थेट गॅसवर भाजलेल्या पदार्थांचा आरोग्याला खरंच त्रास होतो का याबाबत

is it healthy to do fulke or bhakri on gas directly without tawa-do know Scientific reason behind the same :Do you also bake poli-bakri directly on gas? Is it good or bad for health, says nutritionist... | तुम्हीही थेट गॅसवर पोळी-भाकरी भाजता? हे आरोग्यासाठी चांगले की वाईट, आहारतज्ज्ञ सांगतात...

तुम्हीही थेट गॅसवर पोळी-भाकरी भाजता? हे आरोग्यासाठी चांगले की वाईट, आहारतज्ज्ञ सांगतात...

आपण रोजच्या जेवणात पोळी, भाकरी, फुलके यांपैकी काही ना काही खातो. हेच आपले मुख्य अन्न असल्याने बहुतांश घरी यापैकी काही ना काही केले जाते. पोळी किंवा भाकरी करण्याची प्रत्येकाही पद्धत वेगळी असली तरी याची बेसिक कृती सारखीच असते. पीठ मळून, लाटून भाजलेला हा पदार्थ पौष्टीक आणि पोटभरीचा असल्याने दिवसातील एका जेवणात तरी खाल्ला जातोच. काही जण घडीच्या पोळ्या करतात तर काही जण घडी न घालता पोळ्या करतात. काही जण पोटात जास्त तेल जाऊ नये म्हणून फुलके केले जातात तर काही जण नियमितपणे भाकरी खाण्याला पसंती देतात (is it healthy to do fulka or bhakri on gas directly without tawa-do know Scientific reason behind the same). 

फुलके, भाकरी यांसारख्या गोष्टी आपण एक बाजू तव्यावर आणि एक बाजू थेट गॅसवर भाजतो. हे दोन्हीही पचायला हलके असल्याने पोळीपेक्षा जास्त चांगले असे म्हटले जाते. पण तव्यावर न भाजता थेट गॅसवर भाजलेले पदार्थ आरोग्यासाठी हानीकारक असतात असा सूर अनेकदा ऐकू येतो. आता यामध्ये कितपत तथ्य आहे आणि थेट गॅसवर भाजलेल्या पदार्थांचा आरोग्याला खरंच त्रास होतो का याबाबत आहारतज्ज्ञ अमिता गद्रे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. गॅसवर फुलके किंवा भाकरी भाजण्याबाबत त्या नेमकं काय सांगतात पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. पोळी गॅसवर भाजली तर त्यातून अॅक्रीलामाईड तयार होते. कार्बोहायड्रेटस असलेला कोणताही पदार्थ थोडासा काळपट होतो तेव्हा तिथे अॅक्रेलामाईडची निर्मिती होते. तळलेला बटाटा, भजी यांमध्येही अॅक्रेलामाईड असते. 

२. अॅक्रेलामाईड शरीरासाठी अतिशय घातक असते. त्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता असते असे गैरसमज आपल्या मनात असतात. पण खऱ्या अर्थाने यामध्ये काहीच तथ्य नाही. 

३. कॅन्सर होण्याची सगळ्यात जास्त भिती ही वाढते वय आणि दारुचे किंवा सिगारेटचे व्यसन यामुळे असते. त्यामुळे अॅक्रेलामाईडला प्रमाणापेक्षा जास्त घाबरण्याची आवश्यकता नाही आणि आपण फुलके, भाकरी गॅसवर भाजू शकतो. 

Web Title: is it healthy to do fulke or bhakri on gas directly without tawa-do know Scientific reason behind the same :Do you also bake poli-bakri directly on gas? Is it good or bad for health, says nutritionist...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.