Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भजी-वडे तळून उरलेल्या तेलातच भाजी-आमटीला फोडणी देता? तज्ज्ञ सांगतात, हे भयानकच कारण..

भजी-वडे तळून उरलेल्या तेलातच भाजी-आमटीला फोडणी देता? तज्ज्ञ सांगतात, हे भयानकच कारण..

Is it healthy to reuse oil for cooking : एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणे शरीरात विविध प्रकारचा ताण निर्माण करणारे असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 05:07 PM2024-10-11T17:07:23+5:302024-10-11T18:04:54+5:30

Is it healthy to reuse oil for cooking : एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणे शरीरात विविध प्रकारचा ताण निर्माण करणारे असते.

Is it healthy to reuse oil for cooking : Experts say if you do so... | भजी-वडे तळून उरलेल्या तेलातच भाजी-आमटीला फोडणी देता? तज्ज्ञ सांगतात, हे भयानकच कारण..

भजी-वडे तळून उरलेल्या तेलातच भाजी-आमटीला फोडणी देता? तज्ज्ञ सांगतात, हे भयानकच कारण..

सणावाराला किंवा एरवीही आपण भजी, वडे, पापड-कुरडई, पुऱ्या असं काही ना काही तळतो. दिवाळीच्या फराळातील बहुतांश पदार्थ तर तळणीचेच असतात. कोणताही पदार्थ तळायचा असल्यास तो नीट तळला जाण्यासाठी तो तेलात पूर्ण बुडेल इतके तेल आवश्यक असते. तरच तो छान खरपूस तळला जातो. म्हणूनच आपण तळण्याच्या पदार्थांसाठी कढईत बऱ्यापैकी तेल घेतो. हा पदार्थ छान तळून होतो, पण त्यानंतर बरेचसे तेल कढईत तसेच राहते. मग हे इतके तेल टाकून देणे शक्य नसते. त्यामुळे आपण गाळणीने गाळून हे तेल इतर पदार्थांना वापरण्यासाठी ठेवतो (Is it healthy to reuse oil for cooking) . 

दुसऱ्या दिवशी भाजी, आमटीला किंवा अन्य पदार्थांना फोडणी देण्यासाठी, कणीक मळण्यासाठी किंवा अन्य काही पदार्थ तळण्यासाठी या तेलाचा वापर होतो. इतके जास्त तेल फेकून देणे शक्य नसल्याने साहजिकच आपण हा सोयीस्कर मार्ग निवडतो. पण हा मार्ग आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणे शरीरात विविध प्रकारचा ताण निर्माण करणारे असते. त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या तक्रारींना तोंड देण्याची वेळ येते. प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट श्वेता शाह पांचाळ हे तेल कशाप्रकारे शरीरावर परीणाम करते याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात...

१. आपण सणाला पुऱ्या किंवा तळणीचे पदार्थ तळतो आणि ते तेल गार झाले की गाळून पुन्हा वापरण्यासाठी काढून ठेवतो. 

(Image : Google)
(Image : Google)

२. असे काढून ठेवलेले तेल हवेतील आर्द्रतेच्या आणि ऑक्सिजनच्या संपर्कात येते. त्यामुळे यामध्ये विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होतात. 

३. असे रासायनिक परीणाम झालेले तेल आरोग्यासाठी अजिबातच चांगले नसते. या रासायनिक घटकांमुळेच आपल्याला हायपरटेंशन, हृदयरोगाशी निगडीत समस्या उद्भवतात. याचा परीणाम म्हणजे हार्ट अॅटॅकही येऊ शकतो. 

४. तसेच शरीरात विशिष्ट प्रकारचा ऑक्सिडेटीव्ह ताण निर्माण होण्यासाठी हे तेल कारणीभूत असते. हा ताण आपल्या शरीरात बराच काळ टिकून राहतो. 


Web Title: Is it healthy to reuse oil for cooking : Experts say if you do so...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.