Join us   

घरात वॉटर फिल्टरमधून गाळून आलेले पाणी पावसाळ्यात पुन्हा उकळून प्यावे का? आजार नको असतील तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 3:02 PM

Is it Necessary to Boil water from water filter : अशाप्रकारे पाणी दोनवेळा शुद्ध करणे खरंच गरजेचं असतं का याविषयी...

डॉ. पूजा रविंद्रकुमार सिंह

पावसाळ्याच्या दिवसांत हवेत आणि पाण्यात विविध विषाणूंची वाढ होते. त्यामार्फत आपल्याला इन्फेक्शन पसरते. म्हणून पाणी पिताना ते उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र अनेकदा घाईगडबडीत आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पूर्वी पावसाळ्यात पाणी शुद्ध होण्यासाठी त्यामध्ये तुरटी फिरवली जायची. तसेच सुती कापड ठेवून पाणी गाळले जायचे. मात्र आता हे मागे पडले आणि घरोघरी वॉर फिल्टर आले. एकदा पाणी वॉटर फिल्टरमधून येत असले की मग चिंता कशाला. आपण पित असलेले पाणी एकदम शुद्ध आहे असा अनेकांचा समज असतो. तर काही जण आरोग्याबाबत जास्तच जागरुक असल्याने ते वॉटर फिल्टर असेल तरीही पाणी उकळून गार करुन मगच ते पितात (Is it Necessary to Boil water from water filter). 

पाणी हे निसर्गाने दिलेली सर्वात महत्वाची देणगी व संसाधन आहे. सुरुवातीला थेट नळाचे पाणी प्यायले जायचे, मात्र काळ बदलला तसे तसे आजार पण वाढत गेल्यामुळे पाण्याचा फिल्टर अस्तित्वात आला. फिल्टर ही पाश्चिमात्य जीवनशैली असून उकळल्यानंतरच पाणी शुद्ध होते अशी आजही अनेकांची समजूत आहे. मात्र फिल्टरमध्ये बरेच प्रकार असतात आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारे पाण्याची शुद्धी होत असते. पाहूयात फिल्टरचे वेगवेगळे प्रकार आणि त्याचे उपयोग. 

(Image : Google)

फिल्टरचे प्रकार

१. यांत्रिक फिल्टर (Mechanical filter)

२. शोषण फिल्टर (Absorption filter)

३. जप्ती फिल्टर  (Sequestration filter)

४. आयन एक्स्चेंज फिल्टर (Ion Exchange filter)

५. रिव्हर्स ऑस्मोसिस फिल्टर (Reverse Osmosis filter)

जो पाणी आपल्याला पाईपलाईन मधून येतो त्याच्या गु्णवत्ता सांभाळून ठेवायला, त्याचा चव, वास चांगला करायला, व त्याला रासायनिक पदार्थ व जीवाणू यांनी मुक्त करायला घरोघरी फिल्टरचा उपयोग होतो. या पाण्याचा जडपणाला कमी करून मृदुत्व आणायला फिल्टरचा उपयोग होतो.

उकळलेलं पाणी-

पाणी उकळणे हा सर्वात जल शुध्दिकरणाचा सोपा उपाय असल्याने घरी किंवा वाळवंटात पण उपयोगी पडतो. पाणी उकळल्यावर त्याच्यातले जीवाणू व सू्क्ष्मजीव मरतात. पाणी उकळल्याने त्यातले धोकादायक रासायनिक पदार्थ नसल्यामुळे, फिल्टर केलेले पाणी उकळून घेणे हा उत्तम जल शुद्धिकरणचा प्रकार ठरतो.

(Image : Google)

उकळलेल्या पाण्याचा फायदा-

आयुर्वेदानुसार, जलामधे गुरु गुण असतो याला लघुतत्वात बदलणे हा महत्वाचा फायदा आहे. यामुळे मनुष्याच्या पचनशक्तीला पण बल प्राप्त होते. उकळलेल्या जल त्रिदोषशामक व वातशामक असतो. ज्यांना बरगड्या आणि पाठीमागे वेदना, नासिकाशोथ (rhinitis),ओटीपोटाचा विस्तार (abdominal distension), उचकी (hiccough)याचा व वातकफज विकारांचा त्रास असतो त्यांना उकळलेल्या पाण्याचा फायदा होतो.

जर पाणी उकळून त्याचे एक चतृथांश भाग केला तर वात रोगांचे शमन होते. उन्हाळयात व शरद ऋतुत याचा चांगला उपयोग होतो. जर पाणी उकळून अर्धा भाग उरलेला असेल तर त्या पाण्याने पित्ताचे रोगांच्या शमन होतो. ह्याचा उपयोग हिवाळय़ात, वसंत ऋतु, वर्षा ऋतुत होतो. जर तो तीन चतुर्थांश भाग उरलेला असेल, त्या पाण्याने क॒फाचे रोगांच्या शमन होतो. या पाण्याने जाठराग्नि वाढतो , कफाची समस्या कमी होते व  वाताच्या समस्येवरही याचा चांगला उपयोग होतो.  अपचन झाले असल्यास उकळलेल्या पाणी गरम असल्याने रात्रीच्या वेळेस घेतल्यावर पचनशक्ती पटकन सुधरते.

(लेखिका एम.डी. आयुर्वेद आहेत) 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपाणीपावसाळा आणि पावसाळी आजारपण