Join us   

शिळा भात खाण्याचे २ फायदे, भात शिळा म्हणून नाक न मुरडता आनंदाने खा कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2023 3:19 PM

Is It OK to Eat Leftover Rice : शिळा भात खाणं टाळताय? मग याचे २ फायदे वाचाच

ठळक मुद्दे शिळा भात खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे शिळा म्हणून नाक मुरडू नका, आनंदाने खा.

भारतीय थाळी भाताशिवाय अपूर्ण आहे. काहींना भाताशिवाय जमत नाही. डिनरमध्ये जर भात (Rice) नसेल तर, काहींना व्यवस्थित झोपही लागत नाही. काही वेळेस भात एक्स्ट्रा शिल्लक राहतो. रात्री उरलेला शिळा भात आपण फेकून देतो. मात्र, आपल्याला माहिती आहे का? की शिळा भात खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

भात शिळा राहिला तर आपण, फ्रिजमध्ये ठेवतो, किंवा सकाळी खराब झाला तर फेकून देतो. त्यामुळे शिळा म्हणून नाक मुरडू नका, आवडीने खा. शिळ्या भातामध्ये लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखे अनेक पौष्टीक घटक आढळतात. शिळा भात खाण्याचे फायदे किती? याने आरोग्याला खरंच फायदा होतो का(Is It OK to Eat Leftover Rice?).

या पद्धतीने करा शिळ्या भाताचे सेवन

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, जर रात्रीच्या वेळेस भात उरला असेल तर, मातीच्या भांड्यात साठवून ठेवा. त्यात थोडे पाणी देखील घाला. असे केल्याने भातामधील यीस्ट वाढेल. आपण शिळा भात नाश्ता किंवा जेवणाच्यावेळी खाऊ शकता. शिळ्या भाताला फोडणीही देऊ शकता. यामुळे भाताची नासाडी होणार नाही. ज्यांना पोटाचे विकार आहे, त्यांनी आठवड्यातून २ ते ३ वेळा शिळा खावा.

कच्चा कांदा खाणं फायद्याचं की शिजवून खाल्लेलाच तब्येतीला बरा? आहारतज्ज्ञ सांगतात, कांदा खाण्याचे फायदे पण..

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

अनेक लोकं वेट लॉस जर्नीमध्ये आपल्या आहारातून भात वगळतात. जर आपल्याला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर, शिळा भात खा. शिळ्या भातात ताज्या भातापेक्षा कमी कॅलरीज असतात. तसेच उच्च फायबर आढळते. ज्यामुळे शिळा भात खाल्ल्यानंतर लगेच भूक लागत नाही. शिळा भात खाऊनही आपण आपले वजन नियंत्रणात ठेऊ शकता.

ना जिम - ना डाएट, रोज सकाळी ५ पैकी १ मॉर्निंग ड्रिंक प्या, वजन आणि पोटही होईल कमी

बद्धकोष्ठतेपासून आराम

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे गंभीर आजार निर्माण होतात. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे विकार वाढतात. व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देत नाही. ज्यामुळे पोटात गॅस, अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. सुमारे ४४-४५ टक्के लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अशा वेळी शिळा भात खा. कारण शिळ्या भातामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

टॅग्स : अन्नहेल्थ टिप्सआरोग्य