Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भुकेच्या वेळी पौष्टीक लाडू खाताय? त्याचा शरीराला खरंच उपयोग होतो? आहारतज्ज्ञ सांगतात...

भुकेच्या वेळी पौष्टीक लाडू खाताय? त्याचा शरीराला खरंच उपयोग होतो? आहारतज्ज्ञ सांगतात...

Is It Okay To Eat Poushtik Ladoo When you are Hungry : बरेच जण नियमितपणे पौष्टीक लाडू खातात, पण त्याचा शरीराला फायदा होतो की नाही, याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2023 09:34 AM2023-07-05T09:34:36+5:302023-07-05T09:35:02+5:30

Is It Okay To Eat Poushtik Ladoo When you are Hungry : बरेच जण नियमितपणे पौष्टीक लाडू खातात, पण त्याचा शरीराला फायदा होतो की नाही, याविषयी...

Is It Okay To Eat Poushtik Ladoo When you are Hungry : Eating nutritious laddu when hungry? Does it really benefit the body? Nutritionists say... | भुकेच्या वेळी पौष्टीक लाडू खाताय? त्याचा शरीराला खरंच उपयोग होतो? आहारतज्ज्ञ सांगतात...

भुकेच्या वेळी पौष्टीक लाडू खाताय? त्याचा शरीराला खरंच उपयोग होतो? आहारतज्ज्ञ सांगतात...

सकाळी उठल्यावर भूक लागते म्हणून किंवा मधल्या वेळेला खाण्यासाठी, डब्यात नेण्यासाठी आपण हमखास पौष्टीक लाडू करतो. यामध्ये ड्रायफ्रूटस, विविध बिया, खारीक पावडर, खजूर, तूप अशा पौष्टीक गोष्टींचा समावेश असतो. काही भागात या लाडुंना भूक लाडूही म्हटले जाते. लहान मुलांच्या आवडीनुसार कधी हे लाडू बेसनाचे तर कधी नाचणीचे, कधी गव्हाच्या पिठाचे तर कधी नुसतं खोबरं आणि पोहे यांचा वापर करुन केले जातात. अशा विविध प्रकारच्या लाडूंमध्ये साखर किंवा गूळ, तूप आणि सुकामेवा हे पदार्थ मात्र कॉमन असतात (Is It Okay To Eat Poushtik Ladoo When you are Hungry). 

घरात आपल्याला हे लाडू बनवायला जमले नाही तर आपण कोणाकडून तरी ते घरगुती पद्धतीने करुन घेतो नाहीतर सरळ दुकानातून विकत आणतो. आजकाल अशाप्रकारचे लाडू विकणारे बरेच ब्रँड शहरात उपलब्ध असतात. हा एक लाडू खाल्ला की भूक भागते आणि अबरचबर खाण्यापेक्षा तब्येतीला ते चांगले असते असा आपला समज असतो. मात्र प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे हे लाडू खाण्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात आणून देतात. लहान मुले किंवा ज्यांना वजन वाढवायचे आहे अशांनी हे लाडू खाणे ठिक आहे, पण तुम्ही रोजच असे लाडू खात असाल तर त्याचा म्हणावा तितका उपयोग होत नाही. मग त्याऐवजी काय खाऊ शकतो पाहूया..
 

१. पौष्टीक लाडूच्या पाकीटाचे लेबल तपासले तर आपल्याला त्यावर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक दिसतो तो म्हणजे साखर किंवा गूळ, पाम शुगर किंवा खजूर. याचाच अर्थ या लाडुंमध्ये सर्वात जास्त प्रमाणात हा घटक असतो. बहुतांशवेळा तो साखर हाच असतो, तसे असेल तर डायबिटीस असणाऱ्यांसाठी किंवा डायबिटीसच्या काठावर असणाऱ्यांसाठी किंवा सामान्यांसाठीही तो घतकच असतो. 

२. त्यानंतर या लाडूंमध्ये असणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे तेल, तूप किंवा बटर हा असतो. हेही आरोग्यासाठी एका ठराविक प्रमाणात खाणे योग्य आहे. पण जास्त प्रमाणात हा घटक असेल तर तो आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. 

३. त्यानंतर सगळ्यात शेवटी असणारा घटक म्हणजे बेसन, सोया पीठ, गव्हाचे पीठ, नाचणीचे पीठ इत्यादी. नटस किंवा सुकामेवा जे पाकीटावर सगळ्यात मोठे दाखवलेले असतात ते सगळ्यात शेवटी असतात. म्हणजेच त्याचे प्रमाण किती असते हे आता आपल्या लक्षात आले असेल. 

लाडू खाल्ल्यावर नेमके काय होते? 

आपल्याकडे येताजाता हे लाडू तोंडात टाकण्याची सवय असते. त्यामुळे एक व्यक्ती साधारणपणे लहान आकाराचे २ लाडू एकावेळी खाते. त्यानंतर त्या व्यक्तीला जवळपास २०० कॅलरीज मिळतात. इतक्या कॅलरीजची आपल्या शरीराला अजिबात गरज नसते आणि हे लाडू खाल्ल्यानंतर आपल्याला काही खाल्ले आहे असे वाटतच नाही. 

मग याला पर्याय काय? 

अशाप्रकारे लाडू खाण्यापेक्षा ऑम्लेट आणि १ पोळी, एग रोल, डोसा किंवा उतप्पा आणि चटणी,  बेसनाचे धिरडे आणि चटणी किंवा लोणचं असे घरात केले जाणारे पदार्थ खाणे आरोग्यासाठी कधीही जास्त चांगले. 
 

Web Title: Is It Okay To Eat Poushtik Ladoo When you are Hungry : Eating nutritious laddu when hungry? Does it really benefit the body? Nutritionists say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.