लिची हे छोटेसे गोड, रसाळ फळ सगळ्यांचं अतिशय आवडते फळ आहे. असा कोणताही व्यक्ती नसेल की ज्याला लिची फळ आवडत नसेल. लिची हे फळ गोल अंडाकृती अक्रोडच्या आकाराचे फळ असते. त्याच्या आतील गर हा रसाळ पाण्याने भरलेला असतो, तसेच याचे बाहेरचे आवरण हे लाल रंगाचे असते. लिचीमध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न आणि मिनरल्स असे पोषक घटक असतात. यामुळे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. अतिशय मधुर, रसाळ उन्हाळ्यात जिभेला शीतलता देणारे हे फळ दिसायला आकाराने लहान असले तरीही चवीला खूपच सुंदर लागते.
प्रामुख्याने उन्हाळ्यात येणारे हे इवलुसे फळ वर्षभरातून एकदाच येते. फळ चवीला मधुर, रसाळ असणारे फळ खाण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट बघावी लागते. हे फळ पाहून कोणालाही ते फळ खाण्याचा मोह आवरला जात नाही. वर्षातून एकदाच येणारे हे फळ खाण्यासाठी आपला जीव आसुसलेला असतो. लिची पोटासंबंधित तक्रारी दूर करण्यास फायदेशीर ठरते. त्याचबरोबर इम्यूनिटी सिस्टम सुधारण्यासाठी मदत होते, बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी लिचीचा आहारात जरुर समावेश करा. लिचीमुळे शरीराला थंडावा मिळतो. त्याचबरोबर उन्हाळात आपल्या शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते. लिची हे फळ गोड असल्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी ते खावे की खाऊ नये असा प्रश्न निर्माण होतो. परंतु न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांनी मधुमेही व्यक्तींसाठी लिची खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे(Is It Safe For Diabetics & Weight Loss To Eat Litchi? Experts Reveal).
मधुमेह आणि वजन कमी करणाऱ्यांनी लिची खावी की खाऊ नये ?
लिची या फळाची चव गोड असते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या व्यक्ती आणि मधुमेह असणाऱ्यांनी हे फळ खावे की खाऊ नये ? आणि खाल्ले तर किती प्रमाणात खावे याबद्दल शंका निर्माण होतात. सुप्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांनी मधुमेह आणि वजन कमी करणाऱ्यांनी लिची हे फळ खावे की खाऊ नये याबाबतीत माहिती दिली आहे. लिचीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ५० इतका असतो त्यामुळे आपण मधुमेही व्यक्ती किंवा वजन कमी करणार असला तर अशा व्यक्तींनी दिवसातून ४ ते ५ लिची खाणे योग्य राहील.
जेवताना जीभ चावली - दाताखाली आली? चटकन करा ५ उपाय - आग होईल कमी...
तसेच दिवसातून आपण ४ ते ५ लिची खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले जाईल अशी भीती अजिबात न बाळगता आपण लिची खाऊ शकता. लिचीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असल्यामुळे आपण आपल्याला हव्या तेवढ्या लिची खाऊ शकतो असे अजिबात नाही तसेच लिचीचा रस पिणे देखील टाळावे, परंतु आपण दिवसभरात ४ ते ५ लिची नक्की खाऊ शकतो.
वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...
रोज किती चमचे साखर खाणं योग्य? साखर खाणं पूर्णच बंद करुन टाकलं तर तब्येत सुधारते, तज्ज्ञ सांगतात...
लिची कधी खावी ?
मधुमेही आणि वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो जेवणानंतर लिची खावी. प्रोटीन आणि फायबरयुक्त अन्नपदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा, त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्याचे प्रमाण जास्त हवे, असा सकस आहार घेतल्यानंतरच आपण लिची खाऊ शकता. तसेच प्रोटीनयुक्त्त नाश्त्यासोबत आपण लिची हे फळ खाऊ शकता. लिची खाण्याआधी जर आपण प्रोटीन व फायबरयुक्त आहार घेतला तर वाढलेले ग्ल्युकोज आणि इन्सुलिन हे प्रमाणात ठेवण्यास मदत होते.