Join us

पुरुषांपेक्षा महिलांना दारू पिण्याच्या त्रास जास्त होतो? काय सांगतात अभ्यास - वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2025 19:20 IST

Is It Safe For Women To Consume? : महिलांसाठी अल्कोहल पिणे जास्त धोक्याचे .

आजकाल पार्टी म्हटलं की दारू, सिगारेट यांच्या शिवाय मज्जा येतच नाही. व्यसनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. लोकं 'मला फार टेंशन आहे'. 'मी डिप्रेशनमध्ये आहे.' अशी कारणे देऊन व्यसन करतात. (Is It Safe For Women To Consume?  )कारणे काहीही असोत पण अशा पदार्थांचे सेवन करणे शरीरासाठी नक्कीच हानिकारक आहे. भारतात आजही असा महिला वर्ग आहे, जो नवऱ्याच्या दारू पिण्याच्या सवयीला बळी पडतो. नशा मुक्त गाव अशा घोषणा देणाऱ्या महिलांना आपण पाहतच असतो. (Is It Safe For Women To Consume?  )पण आताच्या मॉडर्न जमान्यात महिलासुद्धा व्यसनाच्या आहारी गेल्या आहेत. ३१ डिसेंबरचे व्हिडियो आपण सगळ्यांनीच पाहीले आहेत. महिलांनी खुपच जास्त मध्याचं सेवन केलं होतं. एकेका मुलीला उचलून नेण्यासाठी तिचे मित्र आणि दोन पोलीस लागत होते. अशा अनेक मुली क्लबच्या बाहेर रस्ताभर पडल्या होत्या. त्यांना उचलताना पोलि‍सांच्या नाकी नऊ आले होते.

'मुलं पितात म्हणून आम्ही पण पिणार', या विचारधारणेला काहीच अर्थ नाही. मुळात मुलगा काय आणि मुलगी काय व्यसन कोणीच करू नये. महाराष्ट्रात अल्कोहोल सेवन करण्यासाठी  वय २५ पूर्ण असले पाहिजे. हा नियम आहे. पण आजकाल १६ ते २० वयोगटातील तरूण जास्त दारूचे सेवन करतात. (Is It Safe For Women To Consume?  ) एवढंच नाही तर शाळेतील मुलं मुली दारू पिण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. भारतात अल्कहोल बॅन नाही. पिण्यावर बंदी नाही. त्यामुळे व्यसन करण्यापासून कोणीही कोणाला अडवू शकत नाही. 

व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या तरूणींची संख्या वाढत चालली आहे. मुलींना दारू लवकर चढते हे तर आपण ऐकून आहोत. आणि ते सत्य आहे. त्यामागे शास्त्रीय कारणे आहेत. पुरूषांची आणि महिलांची शरीर रचना वेगळी असते. मुलींच्या शरीरातील पाण्याची पातळी ही मुलांपेक्षा कमी असते. मुलांच्या शरीरातील पाण्यात अल्कोहोल मिसळते. मुलींतच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने अल्कहोल रक्तात मिसळते. त्यामुळे मुलींना हँगोवर जास्त होतो. मध्य रक्तात मिसळत असल्याने धोका ही जास्त असतो. शरीरातील पित्ताचे प्रमाणही महिलांचे आणि पुरूषांचे वेगवेगळे असते. त्यामुळे महिलांनी मध्यपान करणे टाळावे.    

टॅग्स : अमली पदार्थआरोग्यदारूबंदीमहिला