अनेकांना बाटलीतील पाणी पिण्याची (Stale Water) सवय असते. तहान लागली की, बॉटलमधून पाण्याचा घोट घेतो. बरेच जण रात्री बॉटलमध्ये ठेवलेलं पाणी सकाळी पितात. पण बॉटलमध्ये साठवलेलं पाणी पिणं आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य असते का? मानवी शरीर ७० टक्के पाण्याने बनलेले आहे. शरीराचे तापमान राखण्यासाठी, यासह डिटॉक्सिफिकेशनसाठी नियमित पाणी पिणं गरजेचं आहे (Health Care Tips). पण जर फ्रेश पाणी उपलब्ध नसेल तर, बाटलीतील साठवलेलं पाणी पिणे कितपत योग्य आहे?(Is it safe to drink stale water).
साठवलेले पाणी प्यावे की टाळावे?
पाण्याला चव नसते, असे म्हटले जाते. पण प्रत्येक भागातील पाणी हे चवीला वेगळे लागते. पण साठवलेल्या पाण्याची चव वेगळी का लागते? याचा आपण कधी विचार केला आहे का? साठवलेल्या पाण्याची चव कार्बन डायऑक्साइडमुळे बदलते. हवेतील कार्बन डायऑक्साइड त्यात विरघळू लागते. यामुळे पाण्याची पीएच पातळी कमी होते. या करणामुळे साठवलेल्या पाण्याची चव वेगळी लागते. पण तरीही हे पाणी पिण्यायोग्य मानले जाते. पण जर आपण पाणी उबदार ठिकाणी साठवून ठेवत असाल तर, त्यात बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. जे पिण्यायोग्य नसते.
काय सांगता! फळांचा रस प्यायल्याने वाढते वजन? काय खरं काय खोटं? संशोधक सांगतात..
बॉटलमध्ये स्टोर करून ठेवलेलं पाणी कितपत सुरक्षित?
बॉटलमध्ये अधिक वेळ साठवलेलं पाणी पिण्यायोग्य नसते. कारण जेव्हा आपण पाणी पिण्यासाठी बाटलीच्या काठावर तोंड ठेवतो तेव्हा आपली त्वचा बॅक्टेरियाच्या संपर्कात येते. आपल्या लाळेमध्ये देखील भरपूर बॅक्टेरिया असतात. जे बाटलीतल्या पाण्यात मिसळतात. त्यामुळे आपल्या शरीरात बॅक्टेरिया प्रवेश करतात. ज्याचा थेट दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
पाणी नेमकं कशात साठवून ठेवावे?
- जर आपण रात्री पाणी भरून ठेवत असाल तर, ते झाकून ठेवा.
घाईघाईत बकाबका ५ मिनिटांत जेवता? संशोधन सांगते, वजन वाढण्यापासून पित्ताच्या त्रासाचं महत्त्वाचं कारण
- बाटलीतून पाणी पिताना त्यात तोंड घालून पिऊ नका.
- पाणी पिण्यासाठी नियमित ग्लासचा वापर करा.
- जर आपल्याकडे फिल्टर नसेल तर, पाणी उकळवून प्या.