रोज एकतरी सफरचंद खायला हवा, असं डॉक्टरांनी कायम आपल्याला सांगितलं आहे. कुणी आजारी पडलं किंवा कुणाच्या घरी जाताना आपण नेमकं काय घेऊन जावं हा प्रश्न नेहमीच सतावतो.(Is it safe to drink water after eating fruits) अशावेळी हेल्दी पर्याय म्हणून आपण फळे नेतो. फळे ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. (Drinking water and fruit digestion) यामध्ये शरीराला हवी असणारे सर्व पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. फळांचे सेवन केवळ आजारांपासूनच नाही तर संपूर्ण आरोग्याला निरोगी ठेवण्याचे काम करते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते फळांना आपण दैनंदिन आहाराचा एक भाग बनवायला हवं. (Is it harmful to drink water after fruits)आरोग्याला पुरेशा प्रमाणात पोषण मिळावे यासाठी आपल्या ताटात विविध रंगाचे पदार्थ नेहमी असायला हवे असे तज्ज्ञ सांगतात.(Water and fruit digestion myths) यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. योग्य वेळी फळे खाल्ल्याने शरीराला पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत होते. ज्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. (Proper timing for drinking water after fruits)
मात्र अनेकदा फळे खाल्ल्यानंतर आपण अनेक सामान्य चुका करतो ज्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. फळे खाल्ल्यानंतर आपण पाणी पितो ज्यामुळे सर्दी, खोकला किंवा घसा दुखणे यांसारख्या सामान्य तक्रारी सहन कराव्या लागतात. तसेच पचनसंस्था देखील खराब होते. फळांवर पाणी प्यायल्याने काय होऊ शकते पाहूया.
1. पचनसंस्था खराब
फळांमध्ये असलेले फायबर आणि नैसर्गिक साखर पचण्यास थोडा वेळ लागतो. फळे खाल्ल्यानंतर पाणी लगेच प्यायले तर पचन मंदावते ज्यामुळे पोट जड होते आणि पचनसंस्था बिघडते.
2. आम्लपित्त आणि गॅसची समस्या
पाणी पिण्यामुळे पोटातील पीएच संतुलन बिघडू शकते. ज्यामुळे आम्लपित्त आणि गॅसची समस्या तयार होते. संत्री, अननससारखे आंबट फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने त्रास होतो. तसेच सर्दी, पडसे सारखे आजार देखील होतात.
3. पोटाचे संसर्ग
काही फळांमध्ये नैसर्गिक एंजाइम असतात. जे पचनास मदत करतात. परंतु फळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने एंजाइम पातळ होते यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. ज्यामुळे पोटात संसर्ग होऊन अपचनाचा त्रास होतो.
4. पोट फुगणे
फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोट फुगणे किंवा जड होण्याची समस्या होते. ही समस्या काकडी, पपई आणि कलिंगड खाल्ल्यानंतर होते. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही फळे खाल्ल्यावर पाणी पिऊ नका.
5. पाणी कधी प्यावं?
1. फळे खाल्ल्यानंतर किमान ३० ते ४० मिनिटांनी पाणी प्यावं
2. जर आपल्याला खूपच तहान लागली असेल तर कोमट पाण्याचे एक किंवा दोन घोट प्यावे.
3. टरबूज आणि खरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये यामुळे आम्लपित्त आणि गॅससेचा त्रास होतो.
4. संत्री, लिंबू आणि अननस अशा लिंबूवर्गीय फळांवर पाणी प्यायल्याने पोटात आम्ल तयार होते.
5. काकडी आणि भोपळ्यात अधिक प्रमाणात पाण्याचे असते. त्यामुळे लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो.