Join us   

दूध पिण्यापूर्वी किंवा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2023 8:02 PM

Why can't we drink water right after we drink milk ? What is the scientific explanation behind this ? : दूध प्यायल्यावर लगेच पाणी पिऊ नये असं म्हणतात ते किती खरं किती खोटं ?

दूध आणि पाणी हे दोन्ही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते आणि त्यामुळे शरीरातील अनेक कार्ये सुरळीत चालण्यास मदत होते. तसेच दुध हे अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, कोलीन, सेलेनियम यांसारखी आवश्यक खनिजे तसेच जीवनसत्त्वे ए, बी, डी, रिबोफ्लेविन अतिशय चांगल्या प्रमाणात असतात, जे एकूणच शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. 

बरेचदा आपण पाहतो की अनेकजण दूध प्यायल्यानंतर काहीवेळाने पाणी पितात किंवा दूध पिण्यापूर्वी पाणी पितात. अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न येतो की असे करणे योग्य आहे का ? असे करणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का ? आपण दूध पिण्यापूर्वी किंवा नंतर लगेच पाणी पिणे हे योग्य आहे का ? असे केल्याने  याचे आपल्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होतात का ? क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी या विषयासंदर्भात अधिक माहिती दिली आहे(Is It Safe To Drink Water Right After Drinking Milk ? Here's The Answer!).

दूध पिण्याआधी किंवा नंतर पाणी पिणे योग्य की अयोग्य ? 

क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि आहारतज्ज्ञ गरिमा गोयल सांगतात, दूध पिण्याआधी किंवा नंतर त्यावर लगेच पाणी पिण्याने आपल्या आरोग्यावर त्याचा खूप मोठा हानिकारक परिणाम होईल, अगदी असेच नसते. परंतु ही सवय आपल्या आरोग्याला काही प्रमाणात नुकसान पोहोचवू शकते. दूध आणि पाणी हे दोन्ही द्रव पदार्थ आहेत. दूध पिण्याआधी किंवा नंतर लगेच त्यावर पाणी प्यायल्यास, दुधातील पोषणमूल्यांचा आपल्या शरीराला पुरेसा फायदा होत नाही. आपण सगळेचजण दूध पितो कारण ते पौष्टिकतेने परिपूर्ण आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दूध पिण्याआधी किंवा नंतर त्यावर लगेच पाणी प्यायल्याने पचन आणि दुधातील पोषक तत्वांचे शोषण करून घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. 

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करायला जास्त वेळ लागतो असे का ? वजन लवकर घटत नाही कारण...

वास्तविक, आपण खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन होऊन आणि त्यातून पोषक द्रव्ये शोषण्याची प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी आपल्या शरीरात पुरेसे उबदार वातावरण किंवा अम्लीय वातावरण असणे खूप गरजेचे असते. परंतु आपण लगेच पाणी प्यायल्यामुळे पोटाचे वातावरण थंड होते. त्यामुळे आपण खाल्लेले अन्न नीट पचत नाही. जर आपण कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी प्याल तर ते अन्न सरळ आतड्यात ढकलले जाते. अशा प्रकारे आपल्याला खाल्लेल्या अन्नाचा पूर्ण लाभ मिळत नाही.

जाॅगिंग रोज करण्याचा फायदा होतो की तोटा ? ५ गोष्टी जॉगिंग करतानाच काय चालतानाही विसरु नका...

वजन कमी करण्यासाठी दिवसभरात थोडे थोडे खाता ? ५ गोष्टी विसरू नका, नाहीतर होईल उलटेच...

दूध प्यायल्यानंतर नेमकं किती वेळाने पाणी प्याव ?

फक्त दूधच नाही तर कोणतेही पदार्थ किंवा जेवण जेवायच्याआधी किमान २५ ते ३० मिनिटे तसेच खाल्ल्यानंतर ४५ मिनिटे पाणी अजिबात प्यायचे नाही. अगदीच गरज वाटली तर आपण एक - एक घोट हळुहळु पाणी पिऊ शकतो. परंतु आपण खाल्लेले अन्न किंवा दूध प्यायल्यानंतर त्यातील सगळी महत्वाची पोषणमूल्य आपल्याला मिळावी असे वाटत असल्यास ४५ ते ५० मिनिटांनंतर पाणी प्यावे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य