Join us   

केळी रात्री का खाऊ नये? दूध-केळी-शिकरण खाणं पोटासाठी अपायकारक असतं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2023 5:51 PM

Is it safe to eat bananas at night? केळी आवडतात म्हणून वाट्टेल तेव्हा वाट्टेल तितकी केळी खाल्ली तर पोट बिघडणारच , कारण..

केळी कुठंही मिळतात, इतर फळांच्या तुलनेत तर स्वस्तही असतात. एक केळे खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते. काहीजण एकावेळी दोन-तीन केळी सहज खातात. मात्र केळी कधी आणि किती खावी, केळी उपाशीपोटी खावी की जेवण झाल्यावर. केळीसह आणि केळी खाल्ल्यावर काय खाऊ नये याची काळजी घेतली नाही तर पोट बिघडण्याची शक्यता असते. आवडतात म्हणून भरपूर केळी वाट्टेल त्यावेळी खाणे योग्य नाही. न्यूट्रिशनिस्ट विपिन एका पोस्टमध्ये सांगतात केळी खाताना घ्यायची काळजी(Is it safe to eat bananas at night?).

केळी खाल्ल्यानंतर १ तास पाणी पिऊ नये

कोणतेही फळ खालल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. साधारण एक तासानंतर  पाणी प्यावे. केळी पचनास जड असून, पाण्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. 

एक मूठभर चणे आणि गूळ सकाळी उठल्या उठल्या खा, 5 आजार राहतील लांब

रात्री केळी खाणे टाळा

केळी रात्री खाऊ नये. हे फळ कफ वाढवणारे मानले जाते. म्हणूनच रात्री केळी खाल्ल्यास कफ, खोकला, छातीत दुखणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. दिवसा केळी खाणं योग्य.

रोज नियमित २ खजूर खाण्याचे १० फायदे, तूप घालून खा किंवा तसेच-खजूर आहारात हवेतच

दूध केळी नको

ज्यांना मसल्स वाढवायचे आहे. किंवा ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांना बनाना शेक पिण्याचा सल्ला मिळतो. पण आयुर्वेदानुसार दूध - केळी एकत्र खाणे विरुद्ध अन्न मानले जाते. त्याने कफ दोष वाढू शकते. पचनसंस्था बिघडू शकते. त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात.

केळी खाण्याचे फायदे

केळी हे एक सुपरफूड आहे. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. याशिवाय केळीमध्ये स्टार्च असते, जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, व पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करते. पोटॅशियम, जस्त, लोह यांसारख्या खनिजांसोबत केळी हे एक ऊर्जेचे मजबूत स्त्रोत आहे, यासह यात अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे केळी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनेच खाणे योग्य.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य