Join us   

रात्री उरलेलं वरण-डाळ सकाळी खाता? १ गोष्ट चुकवू नका-ॲसिडीटी होईल, पोट बिघडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2024 4:45 PM

Is it safe to eat leftover Dal? Here's what Dietician Says.. : शिळं वरण आणि डाळ खाण्याचे तोटे जास्तच, पण तरी लक्षात ठेवा १ गोष्ट

दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण, लोकांच्या घरी दिवसातून एकदा तरी डाळ तयार केली जाते (Leftover Dal). तूर डाळ, मसूर डाळ, चणा आणि मूग डाळीचा वापर होतो (Cooking Tips). डाळी शिजवण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत (Health Tips). डाळ (Pulses) शिजल्यानंतर त्याचे अनेक पदार्थ केले जातात. आणि उरलेली शिजलेली डाळ आपण फ्रिजमध्ये ठेवतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उरलेलं वरण गरम करून खातो. पण शिळं वरण खावं की नाही?(Is it safe to eat leftover Dal? Here's what Dietician Says..).

याबद्दल पोषणतज्ज्ञ शिल्पा मित्तल सांगतात, 'प्रत्येक डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. यासह डाळीमध्ये कार्ब्सचे प्रमाणही जास्त असते. याव्यतिरिक्त त्यात झिंक, फोलेट, व्हिटॅमिन बी १२ आणि इतर पोषक घटक असतात. ज्याचा फायदा आरोग्याला होतो. पण शिळी डाळ आरोग्यासाठी घातक ठरू शकते. फ्रिजमध्ये आपण जेव्हा डाळ ठेवतो, तेव्हा उरलेल्या डाळीतील पौष्टीक घटक कमी होतात.' त्यामुळे शिळी डाळ खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? 

दांडिया-गरबा नाईटला आकर्षक दिसायचंय? ट्राय करा 'हे' ७ घागरा चोली लुक्स

शिळी डाळ खाण्याचे नुकसान

पोषणतज्ज्ञ शिल्पा मित्तल म्हणतात, 'अनेकदा डाळ शिजल्यानंतर आपण हवी तेवढ्या डाळीचा वापर करून उरलेली डाळ फ्रिजमध्ये ठेवतो. पण शिळी डाळ खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. यामुळे पोटदुखी, फुगणे, किंवा अॅसिडिटी होऊ शकतो. शिवाय शिळी डाळ खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते.'

डाळ स्टोअर करण्याची पद्धत

डाळ शिजण्यासाठी ठेवा. नंतर पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवा. डाळ शिजल्यानंतर जर उरली असेल तर, २ तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवा. डाळ स्टोअर करण्यापूर्वी एअर टाईट डब्यात साठवून ठेवा. जेणेकरून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर डाळींमध्ये बॅक्टेरिया वाढणार नाहीत.

चहाची गाळणी कितीही घासली तरी काळीकुट्ट-अस्वच्छच दिसते? १ जबरदस्त ट्रिक; मिनिटांत गाळणी चकाचक

शिळी डाळ खाण्यापूर्वी या गोष्टी करा

जेव्हाही उरलेली डाळ खायची असेल तेव्हा ती फ्रीजमधून काढून आधी चांगली उकळून घ्या. डाळी चांगल्या प्रकारे उकळल्याने त्यात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे डाळी खाण्याचे दुष्परिणाम टाळण्यास मदत होईल. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य