Join us   

बटाट्याला हिरवे-पांढरे कोंब आले तरी ते काढून बटाटे खाता? ही १ डेंजर गोष्ट लक्षात ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2024 6:08 PM

Is It Safe to Eat Sprouted Potatoes? : मोड आलेले बटाटे आरोग्यासाठी त्रासदायकच कारण..

बटाटा सर्वात आवडीने खाल्ली जाणारी भाजी आहे (Potato). बटाटा बाजारात वर्षभर उपलब्ध असते (Health Tips). बटाटा कोणत्याही पदार्थ फिट होतो. शिवाय याची चव सर्वांना आवडते. बटाटा चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बटाट्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी आवश्यक असतात. बटाटे खाल्ल्याने ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.

बटाटा लवकर खराब होत नाही. शिवाय साठवून ठेवण्यासाठी विशेष जागेचीही गरज नाही. ज्यामुळे बरेच लोक एकाच वेळी जास्त प्रमाणात बटाटे विकत आणून ठेवतात. परंतु, महिनोमहिने ठेवल्याने बटाट्याला मोड येतात. शिवाय बटाटे मऊ आणि काळे - हिरवे होतात. पण मग मोड आलेले बटाटे खावे की नाही? असाही प्रश्न निर्माण होतो(Is It Safe to Eat Sprouted Potatoes?).

आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांच्या मते, मोड आलेले बटाटे आपण खाऊ शकतो. पण बटाट्याला जर जास्त अंकुर फुटले असतील तर, त्यात सोलानाईन आणि कॅकोनिन सारख्या विषारी घटकांचे प्रमाण वाढते. जे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.'

मोड आलेल्या बटाट्यांमध्ये असते विषारी घटक

आहारतज्ज्ञांच्या मते, 'बटाट्यामध्ये ग्लायकोआल्कलॉइड्स असतात. हे नैसर्गिक घटक कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी असतात. परंतु, बटाट्याला मोड आल्यावर याचे प्रमाण वाढते. जेव्हा बटाट्यामध्ये ग्लायकोआल्कलॉइड्सचे प्रमाण 20 मिलीग्राम प्रति 100 ग्रॅम बटाट्यापेक्षा जास्त होते, तेव्हा ते विषारी असू शकते.

५ गोष्टींचा त्रास असेल तर कोमट पाणी कधीच पिऊ नका; वजन कमी करण्याच्या नाद पडेल महागात

मोड आलेले बटाटे खाण्याचे तोटे

मोड आलेले बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्यास, मळमळ, उलटी, जुलाब, पोटदुखी यांसारखी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जास्त प्रमाणात मोड आलेल्या बटाट्याचे सेवन करणे टाळावे.

हिवाळा सुरु होताच हातपाय काळेकुट्ट झाले? खोबरेल तेलात घाला १ गोष्ट- पाहा मऊमऊ जादू

बटाटे कसे स्टोअर करून ठेवावे?

- बटाटे थंड, गडद आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. थेट सूर्यप्रकाशापासून वेगळे ठेवा. यामुळे बटाट्यावर मोड फुटू शकते.

- बाजारातून बटाटे कमी प्रमाणात विकत आणा. विकत घेताना बटाट्याला मोड आलेले नाही ना हे तपासा. शक्य तितके फ्रेश बटाटे विकत घेण्याचा प्रयत्न करा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न