Join us   

रात्रीच्या जेवणात कोणत्या डाळी आणि कडधान्यं अजिबात खाऊ नयेत? तज्ज्ञ सांगतात, पचनाचे त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 3:36 PM

Is it safe to have dal /pulse for dinner? रात्रीचे जेवण हलके असावे, कोणत्या डाळी आणि कडधान्यं रात्री खायची तर काय खबरदारी घ्यायची?

आपल्या आहारात असे अनेक पदार्थ आहेत, जे रात्री जेवणाच्या वेळी न खाण्याचा सल्ला दिला जातो. रात्रीचा आहार हा हलका करावा असे तज्ज्ञ सागंतात. असे अनेक पदार्थ आहेत, जे डिनरमध्ये खाणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. ज्यात काही डाळी आणि कडधान्यांचा देखील समावेश आहे. आता तुम्ही म्हणाल, पौष्टीकतेने परिपूर्ण डाळी व कडधान्य हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मग रात्रीच्या वेळी ते का खाऊ नये?

डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. परंतु, त्यांचे योग्य वेळी सेवन न केल्यास आरोग्याला दुष्परिणाम सहन करावे लागू शकतात(Is it safe to have dal /pulse for dinner?).

यासंदर्भात, डॉ.सुगीता मुटरेजा सांगतात, ''आयुर्वेदानुसार रात्री नेहमी हलका आहार घ्यावा. रात्री जड अन्न खाल्ल्याने पोटावर परिणाम होतो. बहुतांश लोकं रात्री डाळ - चपाती खातात. त्याचा परिणाम वात, पित्त आणि कफवर होतो.''

रात्री डाळ खाण्याचे नुकसान

रात्रीच्या वेळी डाळ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. रात्री डाळ खाल्ल्याने पोटावर परिणाम होतो. यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. जसे की,

गॅस आणि ॲसिडिटी

अपचन

पचनावर परिणाम

अल्कलाइन पाणी प्या, ॲसिडिटीसह-वजन होईल कमी! -आध्यात्मिक गुरु श्री.श्री. रविशंकर यांचा विशेष सल्ला

पोटदुखी

रात्रीच्या वेळी कोणती डाळ खाणे टाळावे

उडीद डाळ

रात्री उडीद डाळ खाणे टाळावे. उडदाची डाळ पचायला खूप जड असते. ज्यामुळे पोटात गॅस आणि अॅसिडिटी होऊ शकते.

राजमा बीन्स

राजमा हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. मात्र, रात्रीच्या वेळी राजमा खाणे टाळावे. रात्री राजमा नीट पचत नाही. ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे पोटदुखी आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. 

काबुली चणे - छोले

रात्रीच्या वेळी काबुली चणे खाणे टाळावे. छोले पचायला खूप जड असते, ज्यामुळे पोटदुखी, अपचन आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. याकारणांमुळे अनेकदा झोप मोड देखील होऊ शकते. रात्री काबुली चणे खाल्ल्याने सकाळी थकवा आणि सुस्तपणा जाणवू शकतो.

१ चमचा अळशी - चमचाभर दालचिनी पावडर, उपाय २ -बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी

हिरवे वाटाणे

रात्री हिरवे वाटाणे खाणे पूर्णपणे टाळावे. रात्री मटार खाल्ल्याने पोटावर परिणाम होतो. ज्यामुळे पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठतेसारखी समस्या छळू शकते.

हरभरे चणे

हरभऱ्यामुळे पोटात गॅस तयार होतो. म्हणून रात्रीच्या वेळी हरभरे चणे खाणे टाळावे. रात्री हरभरा खाल्ल्याने निद्रानाश, बद्धकोष्ठता आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

डाळी - कडधान्य खाण्याची योग्य वेळ

आयुर्वेदानुसार कडधान्ये - डाळी खाण्यासाठी दुपारची वेळ उत्तम मानली जाते. रात्रीच्या वेळी आपण मुग डाळ खाऊ शकता. यासह तूर डाळ खायची असेल तर, त्यात हिंग आणि जिरे मिसळा. रात्री झोपण्याच्या ३ तास आधी डाळी खाव्या, त्यानंतर डाळी - कडधान्य खाणे टाळावे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य