Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सगळं कुटुंब मिळून आंघोळीला एकच साबण वापरता? रिसर्चचा दावा, तसं करणं आरोग्यासाठी धोक्याचं कारण...

सगळं कुटुंब मिळून आंघोळीला एकच साबण वापरता? रिसर्चचा दावा, तसं करणं आरोग्यासाठी धोक्याचं कारण...

Is it ok to share the same soap with your family? : आंघोळीचा प्रत्येकाचा साबण वेगळा असतो की एकच वापरता? त्यानं संसर्गाचा धोका वाढतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 01:27 PM2023-07-18T13:27:01+5:302023-07-18T13:37:48+5:30

Is it ok to share the same soap with your family? : आंघोळीचा प्रत्येकाचा साबण वेगळा असतो की एकच वापरता? त्यानं संसर्गाचा धोका वाढतो..

Is it safe to use the same soap for the whole family? | सगळं कुटुंब मिळून आंघोळीला एकच साबण वापरता? रिसर्चचा दावा, तसं करणं आरोग्यासाठी धोक्याचं कारण...

सगळं कुटुंब मिळून आंघोळीला एकच साबण वापरता? रिसर्चचा दावा, तसं करणं आरोग्यासाठी धोक्याचं कारण...

साबण हा आपल्या रोजच्या आंघोळीचा एक महत्वाचा भाग आहे. साबणाने आंघोळ केल्याने आपल्या अंगाला चिकटलेली धूळ, माती, बॅक्टेरिया हे सगळे नाहीसे होऊन आपले शरीर स्वच्छ केले जाते. असे असले तरीही भारतातील जवळजवळ प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबात टीव्हीच्या रिमोटशिवाय आणखी एक गोष्ट कॉमन असते आणि ती म्हणजे आंघोळीचा साबण. काही घरात प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनुसार किंवा स्किन टाईपनुसार साबण वापरले जातात. परंतु काही घरात एकच साबण सगळेजण वापरतात त्याचबरोबर काही घरात एकच साबण हात धुण्यासाठी व आंघोळ करण्यासाठी वापरले जातात. एकच साबण सगळ्यांनी वापरणे हे कितपत योग्य आहे ? याने आपल्या त्वचेवर काही वेगळा परिणाम होताना दिसतो का ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. 

खरंतर, साबणाचा वापर जीवाणू आणि जंतूंपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी केला जातो. पण हाच साबण जीवाणू आणि जंतूंचे घर बनला तर ? अशाप्रकारे जर आपण एकाच घरात अनेकजण मिळून एकच साबण वापरत असाल तर ते योग्य आहे की अयोग्य ? तसेच सगळ्यांनी वापरलेला साबण वापरताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, याकडे लक्ष देणे अतिशय महत्वाचे असते. याबद्दल इंडियन जर्नल ऑफ डेंटल रिसर्च या अभ्यासामध्ये नेमके काय सांगण्यात आले आहे ते पाहूयात(Is it safe to use the same soap for the whole family?).

संपूर्ण कुटुंबाने नेहमी एकच साबण वापरावा की वापरु नये ? पाहा काय सांगतो रिसर्च... 

साबणाच्या एका वडीवर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया साबणाच्या पृष्ठभागावर चिकटून बसलेले असतात. इंडियन जर्नल ऑफ डेंटल रिसर्चने प्रदर्शित केलेल्या एका अभ्यासानुसार, साबणाच्या एका वडीवर २ ते ५ प्रकारचे वेगवेगळे किटाणू व बॅक्टेरिया लपलेले असतात. याचबरोबर २०१५ साली अमेरिकन जर्नल ऑफ इंफेक्शन कंट्रोल यांनी एका हॉस्पिटलमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, असे निष्कर्ष समोर आले आहेत की, या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या एकूण साबणाच्या ६२% साबण हे सगळ्यांनी हाताळून दूषित झालेले होते. याउलट तिथे उपलब्ध असणारे लिक्विड सोपं हे केवळ ३ % दूषित होते. लिक्विड सोपं हे एका बाटलीमध्ये भरलेले असतात, त्यांना हात न लावता आपण ते सहज हातावर घेऊन हात धुवू शकतो. यामुळे लिक्विड सोपं किंवा हॅन्ड वॉश यांच्या  तुलनेत साबण हे अधिक जास्त दूषित असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर हे दूषित झालेले साबण जर अनेक व्यक्तींनी एकाच वेळी वापरले तर एका व्यक्तीच्या हाताला लागलेले बॅक्टेरिया साबणांमार्फत दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक असते.

मासिक पाळीत डाग पडण्याची भीती, पॅड लिक होते? ५ सोपे उपाय, बिंधास्त व्हा...

 खूप वर्षे तरुण दिसायचंय-तरुण रहायचंय ? हार्वर्ड विद्यापीठाचा अभ्यास सांगतो ५ गोष्टी न चुकता करा...

साबणाच्या एका वडीवर कोणकोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया असू शकतात ? 

साबणावर असलेल्या काही जंतूंमध्ये ई - कोला, साल्मोनेला आणि शिगेला बॅक्टेरिया तसेच नोरोव्हायरस आणि रोटा व्हायरस आणि स्टेफ सारख्या विषाणूंचा समावेश असू शकतो. यांपैकी काही बॅक्टेरिया त्वचेवरील जखमा किंवा ओरखड्यांद्वारे पसरतात, तर काही विष्ठेद्वारे पसरतात.   

रोज १ चमचा तीळ खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते ? पाहा नेमका उपाय काय...

एकच साबण सगळ्यांनी वापरल्याने जंतू संसर्ग होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ? 

१. जर आपल्याला बॅक्टेरिया वाढीच्या भीतीमुळे साबण शेअर करायचा नसेल किंवा वापरण्यास संकोच वाटत असेल, तर त्याऐवजी आपण लिक्विड सोप किंवा बॉडी वॉशचा वापर करू शकता. याचबरोबर आपण अधिक खबरदारी म्हणून झिरो - टच डिस्पेंसर बॉटलचा देखील वापर करु शकता. 

२. आपण जर आपल्या संपूर्ण परिवारासोबत एकच साबण शेअर करत असाल तर आपण तो वापरण्यापूर्वी किमान पाण्याने तरी धुवून स्वच्छ करून घ्यावा. असा स्वच्छ साबण वापरण्याला प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर असा साबण वापरताना नेहमी तो थेट त्वचेवर लावण्यापेक्षा आधी हातांवर चोळून त्याचा फेस तयार करुन घ्यावा, आणि मग तो फेस संपूर्ण शरीभर लावावा. यामुळे थेट साबणाचा आपल्या त्वचेशी फारसा संबंध येणार नाही. याचबरोबर प्रत्येक वापरानंतर ओला साबण वाळवायला विसरू नका. कारण ओल्या साबणावर अधिक बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. 

३. साबणाबरोबरच साबण ज्या केसमध्ये किंवा डबीमध्ये ठेवतो त्या डबीची स्वच्छता करणे देखील तितकेच महत्वाचे असते. ही डबी नियमित धुवून स्वच्छ करा. तसेच ती अधिकाधिक कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Is it safe to use the same soap for the whole family?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.