Join us   

सेक्स केल्यानं वजन वाढलं, पोटासह मागचा भाग खूप वाढला, हा महिलांचा समज खरा की खोटा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 3:00 PM

Is it true that having sex will make hips, thighs bigger? सेक्स करण्याचा आणि वजन वाढण्याचा, पोट-नितंब वाढण्याचा संबंध असतो असा महिलांचा गैरसमज का होतो?

लग्न झाल्यानंतर बाईच्या आयुष्यात व शरीरात अनेक बदल घडतात. महिलेचं शरीर वयानुसार बदलत असते. मात्र एक गैरसमज असा आहे की लग्नानंतर, शरीरसंबंधांमुळे कंबरेचा मागचा भाग, हिप्सचा आकार वाढतो आणि शरीर बेढब दिसते. हे कितपत खरेखोटे. सेक्शुअल हेल्थ अभ्यासक सीमा आनंद सांगतात, लैंगिक संबंध ठेवल्याने स्त्रीचे वजन वाढते का? शारीरिक संबंध ठेवल्यानंतर कंबरेचा व हिप्सचा आकार का वाढतो हे प्रश्न तसे कॉमन आहेत. अनेक महिलांचे गैरसमजही यासंदर्भात दिसतात.

हेल्थ शोट्स या वेबसाईटला माहिती देताना सीमा सांगतात ''शारीरिक संबंध आणि हिप्स वाढण्याचा काहीही संबंध नाही. तसा शास्त्रीय आधार नाही. शारीरिक संबंध ठेवल्यामुळे पोय सुटलं, नितंब, कंबर, मांड्या किंवा शरीराचा इतर भाग वाढतो असे मुळीच नाही.  हार्मोनल बदलामुळे महिलांच्या शरीरात बदल घडतात पण ते वेगळे. चुकीच्या माहितीमुळे सेक्ससंदर्भात काही गैरसमज मनात ठेवू नये(Is it true that having sex will make hips, thighs bigger?).

महिलांचे हिप्स मोठे असण्याची अन्य कारणं..

१. वयानुसार महिलांमध्ये अनेक बदल घडतात. स्त्रियांच्या वयानुसार स्नायू बदलतात. स्नायू नंतर चरबी पेशींद्वारे प्रदान केलेली ऊर्जा वापरण्यास सुरवात करतात. महिलांचे वय वाढले की चयापचय कमी होऊ लागते. यामुळे, हिप्सवर चरबी जमा होऊ लागते.

सतत पोट दुखतं, पचन खराब-पित्त-जुलाब-उलट्या-गॅसेसचा त्रास? आतड्यांचा आजार तर नाही..

२. हिप्स वाढण्यामागे महिलांची बैठी जीवनशैली देखील असू शकते. ज्या स्त्रिया कॅलरी बर्न करण्यासाठी नियमित व्यायाम करत नाहीत, त्यांच्या हिप्सवर चरबी जमा होऊ लागते. 

३. इस्ट्रोजेनमुळे महिलांचे हिप्स मोठे असतात. इस्ट्रोजेन हा एक हार्मोन आहे, जो महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. झीनो किंवा सिंथेटिक इस्ट्रोजेनच्या संपर्कात आल्याने हिप्सचा आकार वाढतो.

समजा, साखर पूर्णच बंद केली तर तब्येतीवर वाईट परिणाम होतात का?

४. गर्भधारणेमुळे महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात. प्लेसेंटा आणि वाढलेल्या कॅलरीजमुळे स्त्रियांचे वजन नैसर्गिकरित्या वाढते. यावेळी हार्मोन्समध्ये अनेक बदल घडतात, ज्यामुळे महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. ज्यात हिप्सचा भाग देखील वाढतो.

टॅग्स : लैंगिक आरोग्यमहिलाहेल्थ टिप्सआरोग्य