Join us   

स्काल्पवर खूप पुरळ आली आहे? खाज येते, पुळ्या दुखतात? ५ उपाय, टाळा हा आजार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 11:58 AM

Itchy Scalp Cure पुरेशा प्रमाणात पोषण न मिळाल्याने किंवा घाणीमुळे टाळूवर पुरळ येण्याची समस्या उद्भवते. ५ टिप्स फॉलो करा, स्काल्पची काळजी घ्या

बदलते ऋतू, हवामान, बिघडलेली जीवनशैलीमुळे अनेकांचे आरोग्य विस्कळीत होत चालली आहे. याचा थेट परिणाम आपल्या केसांवर आणि त्वचेवर पडतो. डोक्यात मुरूम तयार होणे, खाज सुटणे, कोंडा होणे अशा समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. याव्यतिरिक्त टाळूवर घाण, घाम किंवा तेल साचल्यासही समस्या उद्भवू शकते. काही अहवालांनुसार, केसांसाठी रासायनिकयुक्त शॅम्पू, कंडिशनर किंवा हेअर स्प्रे वापरल्यामुळे, टाळूवर मुरुम आणि पुरळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच, बुरशी, उवा किंवा काही विशिष्ट जीवाणूंमुळे, टाळूवर पुरळ ही समस्या निर्माण होते.

स्काल्पवरील मुरुम टाळण्याच्या काही टिप्स

1. फक्त हलके आणि आरामदायी हेल्मेट घाला. यामुळे टाळूवर अतिरिक्त भार पडणार नाही, घाम साचणार नाही आणि मुरुमांचा त्रास होणार नाही.

2. व्यायाम केल्यानंतर किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया केल्यानंतर आपले केस चांगले धुवून घ्या. तसेच केस कधीही ओले ठेवू नका. याने टाळूवर उग्र वास येतो, ज्याने बुरशी तयार होते.

3. केसांवर जास्त रासायनिक उत्पादनांचा वापर करू नका. फक्त नैसर्गिक उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करा. ज्याने केस दाट आणि मजबूत होतील.

4. चांगली आणि मजबूत टाळू हवी असेल, तर नेहमी निरोगी आहाराचे सेवन करा. यामुळे केसांना आणि टाळूला चांगले पोषण मिळेल.

5. वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी केसांचे वेगवेगळे उपचार घेतले जातात. ज्यामुळे टाळू चांगली आणि मजबूत राहते. तुमच्या त्वचेनुसार केसांची योग्य आणि चांगली काळजी घ्या.

टॅग्स : केसांची काळजीहोम रेमेडीत्वचेची काळजी