Join us   

डायबिटिस आहे म्हणून साखरेऐवजी गूळ खाताय? शुगरच नाही डोक्याचा ताप आणि खर्चही वाढेल कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 4:58 PM

Is jaggery a diabetic-friendly sweetener? Uncover the truth : साखर नको म्हणून गूळ, मध खाणं अंगाशी येतंय कारण..

भारतात मधुमेहग्रस्त (Diabetes) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मधुमेह एक मेटाबॉलिक डिसॉर्डर आहे (Health Tips). शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह (Sugar-free) होतो. शरीरातील साखरेची पातळी अनियमितपणे वाढणे देखील घातक ठरू शकते. मधुमेह निदान झाल्यावर आपण डाएटवर अधिक लक्ष देऊ लागतो. व्यायाम आणि डाएट फॉलो केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. पण कधी कधी गोड साखर खाण्याची इच्छा होतेच. साखर ऐवजी लोक गूळ खाण्यास प्राधान्य देतात. पण मधुमेहग्रस्त रुग्णांनी गूळ खावं का?

साखरेला गूळ हा चांगला पर्याय आहे, पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी तो चांगला आहे का? गूळ पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. जेव्हा गुळाची निर्मिती होते, तेव्हा त्यातील पौष्टीक घटक नष्ट होत नाहीत. ज्यामुळे गूळ खाण्याचा सल्ला मिळतो. पण मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी गूळ फायदेशीर ठरते का? याची माहिती आहारतज्ज्ञ कामिनी कुमारी यांनी दिली आहे(Is jaggery a diabetic-friendly sweetener? Uncover the truth).

घटस्फोटानंतरही ‘फक्त मुलांसाठी’ कायम प्रेमानं एकत्र येणारे सेलिब्रिटी आईबाबा, मोडलेल्या संसाराची ‘अशी’ही गोष्ट

मधुमेहात गूळ खाणं फायदेशीर?

गूळ हा आरोग्यदायी पर्याय मानला जातो. पण याच्या अतिसेवनामुळे रक्तातील साखर वाढू शकते. मुळात गुळामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पौष्टिक घटक असतात. मात्र, ते मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी योग्य नाही.

हाय ग्लायसेमिक इंडेक्स

गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ८४.४ आहे. म्हणजेच यात साखरेचं प्रमाण जास्त आहे. अशा स्थितीत गुळाचे अतिरिक्त सेवनाने रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकते.

साखरेचे प्रमाण जास्त

गुळामध्ये सुमारे ६५ - ८५ टक्के सुक्रोज असते. जे जवळजवळ पांढऱ्या साखरेइतके असते. जर मधुमेहग्रस्त रुग्ण गुळाचे अतिप्रमाणात सेवन करत असतील तर, रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

गुळाव्यतिरिक्त गोड पदार्थ खाणे टाळा

जर आपण मधुमेहग्रस्त असाल तर, फक्त गूळ नसून, गोड पदार्थ खाणंही टाळायला हवे. जास्त गोड फळे, मिठाई आणि फ्राईड पदार्थ खाणंही टाळायला हवे. जास्त प्रमाणात गोड पदार्थ किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या अशा पदार्थांचे सेवन करू नका. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. 

टॅग्स : मधुमेहहेल्थ टिप्सआरोग्य