Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वजन कमी करायचं म्हणून आवडता भात बंद? भात कुणी आणि किती खाल्ला तर वजन हमखास कमी होते

वजन कमी करायचं म्हणून आवडता भात बंद? भात कुणी आणि किती खाल्ला तर वजन हमखास कमी होते

Is Rice Good for You? 4 Amazing Health Benefits तांदूळ तुमच्या आरोग्याचा मित्र की शत्रू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2023 04:00 PM2023-07-23T16:00:10+5:302023-07-24T15:52:09+5:30

Is Rice Good for You? 4 Amazing Health Benefits तांदूळ तुमच्या आरोग्याचा मित्र की शत्रू?

Is Rice Good for You? 4 Amazing Health Benefits | वजन कमी करायचं म्हणून आवडता भात बंद? भात कुणी आणि किती खाल्ला तर वजन हमखास कमी होते

वजन कमी करायचं म्हणून आवडता भात बंद? भात कुणी आणि किती खाल्ला तर वजन हमखास कमी होते

'वजन वाढलंय? - भात सोडा', 'डायबिटिज झालाय - भात सोडा', 'अरे, रात्री तरी अजिबातच भात खाऊ नका'. असे वाक्य आपल्या कानी हमखास पडले असतील. परंतु, अशा स्थितीत लोकांना कळून येत नाही, की भात खावावा की टाळावा? अनेकांना जेवणात भात नसला तर, आपण जेवलो आहोत की नाही, असा प्रश्न पडतो. काहींना तर भाताशिवाय जमत नाही. अशा स्थितीत भात नेमका किती प्रमाणात आणि किती दिवस खावा? असा प्रश्न पडतो.

यासंदर्भात, पूनम डाएट अँड वेलनेस क्लिनिक अकॅडमीच्या संचालिका पूनम दुनेजा म्हणतात, “तांदूळ हा भारतातील प्रमुख पदार्थांपैकी एक आहे. पुलाव, बिर्याणी, इडली, इत्यादी अनेक भारतीय पाककृतींमध्ये याचा वापर होतो. त्याचबरोबर यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स शरीराला त्वरित ऊर्जा देतात. तसेच ते ग्लुटेन फ्री आहे. आंबवलेले तांदळाचे पाणी प्रीबायोटिक म्हणून काम करते”(Is Rice Good for You? 4 Amazing Health Benefits).

तांदूळ हे पोषणाचे भांडार

डॉ.पूनम दुनेजा यांच्या मते, ''तांदळात व्हिटॅमिन बी, मॅंगनीज, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि फायबर पुरेशा प्रमाणात असते. हे सर्व पोषक तत्व शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. व्यायामापूर्वी आणि नंतर आपण जेवणात भातासोबत भाज्या एकत्र करून खाऊ शकता. यासोबतच भाताच्या खिचडीमध्ये एक चमचा तूप मिसळून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच पोट हलके राहण्यास मदत होते.''

भात खाण्याचे ४ फायदे

ऊर्जा वाढवण्यास उपयुक्त

आपल्या शरीराला एनर्जी रिलीज करण्यासाठी कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असते. जेव्हा कार्बोहायड्रेट आपल्या शरीरात प्रवेश करतात, तेव्हा शरीर त्याचे उर्जेमध्ये रूपांतर करते. तांदळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण पुरेसे असते. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. यासोबतच ब्राऊन राइसमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीरातील चयापचय क्रिया वाढवतात, ज्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते.

जवसाचे तेल आहारात रोज असले तर बॅड कोलेस्टेरॉल कमी होते, हे किती खरे?

पचन सुधारते

भात पोटासाठी आरोग्यदायी ठरते. यामध्ये असलेले फायबर पचनसंस्था मजबूत ठेवते. यासह तांदूळ शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास मदत करते. भात खाल्ल्याने शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाणही कमी होते.

दाहक-विरोधी आणि ग्लूटेन - फ्री

तांदुळातील दाहक-विरोधी गुणधर्म सेलिआक रोगासाठी फायदेशीर ठरते. तांदूळ ग्लूटेन - फ्री आहे. ज्यामुळे आतड्यात संसर्ग आणि जळजळ होण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत मिळते.

त्वचेसाठी फायदेशीर

त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. यातील फिनोलिक संयुगे त्वचेची जळजळ आणि संसर्ग कमी करतात. तसेच, तांदळातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म एजिंग प्रोसेस कमी करतात.

भिजवलेले ४ बदाम रोज उपाशीपोटी खाण्याचे फायदे, बुद्धी होईल तेज आणि वजन कमी

भात खाण्याचे तोटे?

भात खाणे प्रत्येकासाठी सुरक्षित मानले जाते. मात्र दररोज अधिक प्रमाणात पांढरे तांदूळ खाल्ल्याने टाइप- २ मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तांदळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title: Is Rice Good for You? 4 Amazing Health Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.