उपवासाला हमखास साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते. साबुदाणा खाण्याचा खवय्यावर्ग खूप मोठा आहे. साबुदाण्याचे अनेक पदार्थ केले जातात. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खीर हे पदार्थ उपवासाला केले जातात. साबुदाणा खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच कार्ब्स मिळतात.
साबुदाणामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. पण साबुदाणा खरोखरच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? अलीकडेच लेखक क्रिश अशोक यांनी या संबंधित एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आरोग्याच्या दृष्टीने साबुदाणा आरोग्यदायी नाही असे त्यांचे मत आहे(Is Sago, Sabudana healthy?).
साबुदाणा आरोग्यासाठी किती हानिकारक आहे?
क्रिश अशोक यांच्या मते, ''साबुदाण्यामध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड स्टार्चचे प्रमाण जास्त असते. जर उपवासादरम्यान, आपण साबुदाणा खात असाल तर, कार्बोहायड्रेटमुळे रक्तातील साखर वाढू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे साबुदाणा पारंपारिक नाही. साबुदाणा 1940 आणि 50 च्या दशकात भारतात आला. वास्तविक, ते मुळात पूर्व किंवा दक्षिण पूर्व आशियाचे आहे.''
डायबिटीस असेल तर नक्की प्या ४ गोष्टी, शुगर राहील नियंत्रणात
साबुदाणा का खाऊ नये?
साबुदाणा हा केवळ रिफाइंड स्टार्चचा एक प्रकार आहे. रिफाइमेंटमुळे साबुदाणा लवकर रक्तामध्ये शोषले जाऊ शकते. ज्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका वाढतो. याला उच्च ग्लायसेमिक अन्न मानले जाते. हृदयरोगी, मधुमेहग्रस्त रुग्ण आणि उच्च रक्तदाब असलेल्यांनी असे पदार्थ खाऊ नयेत.
बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी, नियमित खा ४ पदार्थ, गंभीर आजार राहतील लांब
जर आपल्याला मेटाबॉलिक डिसीज, मधुमेह किंवा चयापचय निगडीत त्रास नसेल तर, आपण अधून - मधून संतुलित आहारासोबत साबुदाणा खाऊ शकता. त्यात फायबर आणि वनस्पती विरोधी पोषक तत्व नसतात, ज्यामुळे ते आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. साबुदाण्यामध्ये पौष्टीक तत्वांची कमतरता असल्यामुळे याला बँलेस डाएटसोबत खा.