पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये जगभरातून खेळाडू दाखल झाले आहेत (Soyabean). उत्तम खेळाडू होण्यासाठी अॅथलिट दिवसरात्र मेहनत घेतात. ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी अथक परीश्रम, व्यायाम आणि डाएट फॉलो करणं गरजेचं आहे (Health Tips). रोजचा सराव आणि व्यायामानंतर डाएट महत्वाचा (Olympic 2024). अॅथलिट्स सोयाबिनला सुपरफूड मानतात.
सोयाबिन खाण्याचे अनेक फायदे आहेत (Athletes Diet). सोयाबीनमधील अमीनो ऍसिड स्नायूंच्या वाढीस मदत करतात. १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये सुमारे ३६ ग्रॅम प्रोटीन आढळते. सोयाबीन हे अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे. सोयाबीन खाण्याचे फायदे किती? पाहूयात(Is soybean the new superfood? Know why it is now part of Olympic athlete diets).
पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
सोयाबीनमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. सोयाबीनमधील फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स शरीराची ऊर्जा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन बी आणि लोहासोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ही खनिजे सोयाबीनमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.
मासिक पाळीत कमी रक्तस्त्राव होतो, हा आजार आहे का? ५ गोष्टी खा - तब्येत सुधारेल आणि..
जुनाट आजारांचा धोका कमी
सोयाबीनमध्ये आयसोफ्लाव्होनसारखे संयुगे आढळतात, जे अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असतात. यामुळे अनेक जुनाट आजारांचा धोका कमी होऊ शकतो. सोयाबीनचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. सोयाबीन खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि एकूणच आरोग्याला फायदा होतो.
वेट लॉससाठी मदत
सोयाबीन वेट लॉससाठी मदत करतात. यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे खाल्लेलं व्यवस्थित पचतं. शिवाय यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.