बदलत्या ऋतूनुसार आजार देखील बदलत राहतात. काही आजार डॉक्टरांकडे जाऊन तर काही घरगुती उपायांनी दूर होतात. आजार जर गंभीर असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. काही लोकं घरगुती उपायांचा अवलंब करतात, ज्यात मीठ - साखर पाण्याचा समावेश आहे.
मीठ - साखर पाणी प्यायल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. यासह दिवसभर काम करण्याची उर्जाही मिळते. यामुळे शरीर हायड्रेट राहते. या पण्यात शुगर, कॅलरीज, पोटॅशियम सोडियम असे अनेक पोषक घटक असतात. हे पाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात हे पाहूयात(Is sugar and salt water good for your health?).
शरीराला हायड्रेट ठेवते
डॉक्टर हेल्थ बेनेफिट्स. कॉम या वेबसाईटनुसार, मीठ - साखर पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर हायड्रेट राहते. जर आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास असेल तर, हे पाणी नक्की प्या. त्याच्या सेवनाने डिहायड्रेशन दूर होते. यासह शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
बॅड कोलेस्टेरॉल वाढवणारे ४ पदार्थ सोडा - ४ पदार्थ खा, कोलेस्टेरॉल वाढणार नाही
बद्धकोष्ठतेपासून आराम
पाण्यात मीठ - साखर मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते. जर आपण बद्धकोष्ठतेपासून त्रस्त असाल तर, मीठ - साखरेचे पाणी प्या. हे पोट फुगणे, ब्लोटिंग या समस्यांपासून आराम देते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते
मीठ साखरेचे पाणी प्यायल्याने प्रतिकारशक्ती वाढते. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे शरीराला रोगांशी लढण्यास मदत होते. व बदलत्या ऋतूनुसार होणाऱ्या आजारांपासून सरंक्षण करते.
वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स
शरीराची उर्जा वाढते
मीठ साखरेचे पाणी प्यायल्याने शरीराला त्वरित उर्जा मिळते. हे एक अतिशय ऊर्जावान पेय आहे. याच्या रोजच्या सेवनाने झोप चांगली लागते आणि थकवाही कमी होतो. तसेच शरीराची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमता वाढते.
लो बीपी
ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, त्यांना अनेकदा मीठ साखरेचे पाणी देण्यात येते. हे पाणी प्यायल्याने लो बीपीच्या समस्येपासून सुटका मिळते. अनेकदा हलकी चक्कर आल्यासारखे वाटते, अशावेळी मीठ साखरेचे पाणी प्या, व हे पाणी नेहमी सोबत ठेवा. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा साखर व अर्धा चमचा मीठ मिसळा. व हे पाणी लो बीपी झाल्यावर प्या.