Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डायबिटीस असल्यास ऊसाचा रस प्यावा का? याचा फायदा होतो की शुगर वाढते? तज्ज्ञ सांगतात....

डायबिटीस असल्यास ऊसाचा रस प्यावा का? याचा फायदा होतो की शुगर वाढते? तज्ज्ञ सांगतात....

Is Sugarcane Juice Good for Diabetes : ऊसाच्या रसात पूर्णपणे साखर नसते. यात ७० ते  ७५ टक्के पाणी असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 12:51 PM2023-04-09T12:51:05+5:302023-04-09T12:59:07+5:30

Is Sugarcane Juice Good for Diabetes : ऊसाच्या रसात पूर्णपणे साखर नसते. यात ७० ते  ७५ टक्के पाणी असते.

Is Sugarcane Juice Good for Diabetes : Sugarcane juice side effects harms diabetic patients | डायबिटीस असल्यास ऊसाचा रस प्यावा का? याचा फायदा होतो की शुगर वाढते? तज्ज्ञ सांगतात....

डायबिटीस असल्यास ऊसाचा रस प्यावा का? याचा फायदा होतो की शुगर वाढते? तज्ज्ञ सांगतात....

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला गारवा मिळण्यासाठी थंड पेय घेतली जातात. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. याशिवाय आयर्न, मिनरल्ससारखी पोषक तत्व ही मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण ऊसाचा रस पितात.  साखर, मीठ, लिंबू, बर्फ घालून हा रस तयार केला जातो. ऊस चवीला फारच गोड असतो त्यामुळे डायबिटीक रुग्णांनी उसाचा रस प्यावा की नाही असा प्रश्न पडतो. उसाचा रस प्यायल्यानं ब्लड शुगर वाढते का? डायबिटीक रुग्णांसाठी ऊसाचा रस पिणं कितपत योग्य  ठरतं ते समजून घेऊया. (Is Sugarcane Juice Good for Diabetes)

ऊसाच्या रसात पूर्णपणे साखर नसते. यात ७० ते  ७५ टक्के पाणी असते. १५ टक्के फायबर्स आणि जवळपास १५ टक्के साखर असते. ऊसाचा रस प्रोसेस्ड प्रकियेतून जात नाही. यात  फेनॉलिक आणि फ्लेववॉइड असे एंटी ऑक्सिडंट्स असतात. याशिवाय यात पोटॅशियमही असते. म्हणूनच ऊसाचा रस प्यायल्यानं  शरीरात डिहायड्रेशन होत नाही. ( Sugarcane juice side effects harms diabetic patients)

उसाच्या रसात किती साखर असते?

जवळपास  २४० एमएल उसाच्या रसात साखरेचं प्रमाण  ५० ग्राम असते. कॅलरीज  १८३ आणि फायबर्स  १३ ग्राम असतात. ऊसाच्या रसात प्रोटीन्स आणि फॅट्स असतात. २४० एमएल उसाच्या रसात साखरेचं प्रमाण ५० ग्राम असते म्हणजे १२ साखरेच्या चमच्यांइतके असते. अमेरिकन हार्ट असोशियेशनच्या म्हणण्यानुसार पुरूषांनी  ९ चमचे तर महिलांनी ६ चमचे साखर खायला हवी.  जास्त साखरेचं सेवन नुकसानकारक ठरतं.

पोट, कंबरेचा घेर खूपच वाढला? ५ रिफ्रेशिंग पदार्थ रोज घ्या; व्यायाम न करताच झरझर घटेल चरबी

साखर शरीरात ग्लूकोज लेव्हल वाढवण्याचे काम करते. इंसुलिन योग्य पद्धतीनं न घेतल्यास ग्लूकोज नियंत्रणात राहत नाही. डायबिटीसच्या रुग्णांना साखरयुक्त ड्रिंक्स न घेण्याचा सल्ला दिला जातो.  कारण यामुळे शरीरातील साखरेची पातळी वेगानं वाढू शकते. म्हणूनच रुग्णांनी साखरयुक्त पदार्थांचे सेवन करणं टाळायला हवं.

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे १० जबरदस्त फायदे; गॅस, अपचन- पोटाचे विकार राहतील दूर

तज्ज्ञ आणि अनेक प्रयोगशाळेच्या चाचण्यांनंतर, डॉक्टर मधुमेहामध्ये उसाचा रस पिण्याची अजिबात शिफारस करत नाहीत. उसाच्या रसाचे सेवन केल्याने पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंट्स बाहेर पडतात, जे स्वादुपिंडाला अधिक इंसुलिन तयार करण्यास भाग पाडू शकते. उसाचा रस पिण्याऐवजी तुम्ही कोणत्याही ताज्या फळांचा रस, साखरमुक्त चहा आणि कॉफी घेऊ शकता.

Web Title: Is Sugarcane Juice Good for Diabetes : Sugarcane juice side effects harms diabetic patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.