Join us   

एकमेकांचे उष्टे खाल्ल्याने प्रेम नाही आजार वाढतात, तज्ज्ञ सांगतात, उष्टे खाण्याचे दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2023 3:27 PM

Is there any harm in eating food from the same plate? कितीही प्रेम असलं कुणावर तरी उष्टे खाणे अतिशय घातक, संसर्गजन्य आजारांचा वाढता धोका

'एकमेकांचे उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढते' असे म्हणतात. यामुळे आपण आपल्या कुटुंबियांचे, मित्राचे, किंवा लहान मुलांचे उष्ट खाताना जास्त विचार करत नाही. पण खरंच उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढते का? उष्ट खाल्ल्याने प्रेम नाही तर आजार पसरतात. यासंदर्भात, केअर हॉस्पिटल्सचे डॉ. एम.व्ही रम्या कुमार सांगतात, ''एकमेकांचे उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढते असे म्हणतात, पण या वाक्यामागे किती तथ्य आहे? एकमेकांचे उष्ट खाल्ल्याने प्रेम नाहीतर, आजार पसरतात. त्यामुळे कोणाचेही उष्ट खाऊ नका. यामुळे संसर्गाची भीती निर्माण होते.'' त्यामुळे उष्ट खाल्ल्याने कोणते आजार पसरतात हे पाहूयात(Is there any harm in eating food from the same plate?).

संसर्गाचा धोका अधिक

एकाच ताटात जेवल्याने बॅक्टेरिया पसरण्याची भीती निर्माण होते. विशेषत: जर तुम्ही खात असलेल्या व्यक्तीला संसर्गजन्य आजार असेल तर, हा धोका आणखी वाढतो. सर्दी, फ्लू किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सारखे आजार अन्नाद्वारे सहज पसरू शकतात.

पचनाच्या निगडीत समस्या

जेव्हा आपण दुसऱ्याच्या ताटातील पदार्थ खातो, तेव्हा हे अन्न किंवा ताट स्वच्छ असेल, याची कल्पना आपल्याला नसते. यासह हात देखील स्वच्छ असतील की नाही, हे खात्री करून अन्न खावे. अस्वच्छ हाताच्या विषाणूमुळे अन्न बाधित होते. हे अन्न थेट पोटात जाते, ज्यामुळे पोटात बॅक्टेरिया आणि इतर जंतूंचा प्रवेश होतो. अशा स्थितीत पोटाच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात.

रोज सकाळी उपाशीपोटी १ चमचा तूप खाण्याचे ६ फायदे, कॉन्स्टिपेशन आणि वजन दोन्ही होईल कमी

पोषक तत्वांची कमतरता

जेव्हा आपण दुसऱ्याच्या ताटातून अन्न खातो, तेव्हा आपल्या शरीराला हवे ते पौष्टीक घटक मिळत नाही. यामुळे आपल्या शरीरात पोषक घटकांची कमतरता भासते.

ऍलर्जीची समस्या

दुसऱ्याच्या ताटातून उष्ट अन्न खाल्ल्याने ऍलर्जी पसरू शकते. उष्ट खाल्ल्याने क्रॉस कंटॅमिनेशन  होऊ शकते. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे आपण आजारी पडू शकता.

अंगकाठी बारीक पण पोट खूप सुटले? झोप कमी झाल्याचा परिणाम, वाढतोय पोटाचा घेर कारण

उष्ट अन्न खाताय तर या गोष्टी लक्षात ठेवा

- जंतूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जेवणा आधी हात नीट धुवा. 

- जेवण वाढताना हात स्वच्छ धुवा. हात आणि अन्न यांचा थेट संपर्क टाळण्यासाठी, प्रत्येक पदार्थ विविध डिशमध्ये ठेवा.

- जर एखाद्याला विशिष्ट खाद्यपदार्थाची ऍलर्जी असेल तर त्याच्यासोबत पदार्थ शेअर करू नका.

- उष्ट खाणे शक्यतो टाळा. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य