Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मान - खांदे - पाठ सतत दुखते? तुम्ही चुकीची ब्रेसियर तर वापरत नाही ना? महिलांना छळतो हा आजार...

मान - खांदे - पाठ सतत दुखते? तुम्ही चुकीची ब्रेसियर तर वापरत नाही ना? महिलांना छळतो हा आजार...

Your Bra Might Be Causing Pain : ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम (BRA STRAP SYNDROME) म्हणजे नेमकं काय ? ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम टाळण्यासाठी सोपे ६ उपाय कोणते.. ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 06:45 PM2023-08-22T18:45:02+5:302023-08-22T20:08:39+5:30

Your Bra Might Be Causing Pain : ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम (BRA STRAP SYNDROME) म्हणजे नेमकं काय ? ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम टाळण्यासाठी सोपे ६ उपाय कोणते.. ते पाहूयात...

Is Your Bra Responsible for Chronic Neck, Shoulder and Back Pain? | मान - खांदे - पाठ सतत दुखते? तुम्ही चुकीची ब्रेसियर तर वापरत नाही ना? महिलांना छळतो हा आजार...

मान - खांदे - पाठ सतत दुखते? तुम्ही चुकीची ब्रेसियर तर वापरत नाही ना? महिलांना छळतो हा आजार...

'ब्रेसियर' हा महिल्यांच्या रोजच्या वापरातील एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. ब्रेसियर रोज वापरत असल्याने ती कम्फर्टेबल असणे गरजेचे असते. 'ब्रेसियर' इतकी महत्वाची असून देखील त्याची साइज कित्येकींना नीटशी माहितही नसते, असे आपल्याला कोणी म्हटले तर आपल्याला खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे, आपल्यापैकी अनेकींना आपल्या ब्रेसियरचा, ब्रेस्टचा साइज नीट माहित नसतो. तो कसा मोजायचा याबाबतही पुरेशी माहिती नसते. त्यामुळे आपण ब्रेसियरचा रंग, कापड याकडे पाहतो पण त्याचा साइजच व्यवस्थित नसला तर आपल्या स्तनांचा आकार विचित्र दिसतो आणि कालांतराने आपल्याला आरोग्याच्याही काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. 

ब्रेसियरची साइज चुकीची असेल आणि त्यावर आपण कितीही सुंदर कपडे घातले तरी ते व्यवस्थित दिसत नाही. अनेकदा चुकीच्या साइजमुळे, तर कधी ब्रेसियर  खूप घट्ट झाल्याने आपण अनकम्फर्टेबल होतो. एवढेच नव्हे तर अनेकवेळा चुकीच्या साईजची ब्रेसियर घातल्याने पाठ किंवा खांदे दुखू लागतात, ही समस्या दीर्घकाळ टिकून राहू शकते. इतकेच नाही तर चुकीची ब्रेसियर घातल्याने पाठीवर डाग पडतात आणि त्वचा लाल होते. या प्रकारची स्थिती ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम (BRA STRAP SYNDROME) म्हणून ओळखली जाते, ज्याला कॉस्टोक्लाव्हिक्युलर सिंड्रोम देखील म्हणतात. या संदर्भात, नवी दिल्ली येथील मदर्स लॅप आयव्हीएफ केंद्रांतील वैद्यकीय संचालक, स्त्रीरोग आणि IVF विशेषज्ञ, डॉ. शोभा गुप्ता यांनी अधिक माहिती दिली आहे(Is Your Bra Responsible for Chronic Neck, Shoulder and Back Pain?).

ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम का होतो ?

सर्व प्रकारच्या ब्रामुळे ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम (BRA STRAP SYNDROME) होत नाही. पण, जर आपण चुकीच्या प्रकारची किंवा साजची ब्रा घातली, जसे की अधिक घट्ट ब्रेसियर म्हणजेच तुमच्या स्तनाच्या आकारापेक्षा लहान असलेली ब्रेसियर, तर ही समस्या उद्भवू शकते.याचबरोबर, जर तुम्ही नियमितपणे स्तनाच्या बाजूने खूप घट्ट असलेल्या पातळ पट्ट्या असलेली ब्रेसियर वापरत असाल तर अशा प्रकारची समस्या उद्भवू शकते. आपल्या ब्रेसियरचा कप साइज बरोबर नसला तरीही या प्रकारची समस्या निर्माण होऊ शकते. विशेषत: हेव्ही ब्रेस्ट असलेल्या महिला आणि मध्यमवयीन महिलांना ब्रा स्ट्रॅप सिंड्रोमचा धोका अधिक असतो.

‘बाईपण’ अवघड ? - जया आणि साधनासारखाच संकोच वाटतो ? योग्य मापाची ब्रेसियर कशी निवडायची हेच माहिती नाही ?

मासिक पाळीच्या ४ दिवसात आंघोळ करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची ? आरोग्य आणि हायजिन सांभाळा...

ब्रा स्ट्रॅप सिंड्रोमचे परिणाम... 

जर आपण सतत चुकीच्या आकाराची किंवा साइजची ब्रेसियर घालत असाल तर त्यामुळे आपल्याला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये त्वचेच्या समस्या, खांदेदुखी, पाठदुखी, मानदुखी यांचा समावेश होतो. अगदी घट्ट किंवा चुकीच्या आकाराची ब्रेसियर घातल्यानेही मज्जातंतूचे नुकसान, स्नायू कमकुवत होणे आणि खराब बॉडी पोश्चर होऊ शकते. जर आपण बराच काळ चुकीच्या साइजची ब्रेसियर घातली तर वेदनांची स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. इतकेच नाही तर या स्थितीची वेळीच काळजी घेतली नाही तर महिलांच्या पाठ, खांदे आणि मानेचे दुखणे खूप तीव्र होऊ शकते, जे दीर्घकाळ टिकून राहू शकते.

ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स म्हणजे काय ? मासिक पाळीत ‘हे’ पॅड्स वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कारण...

ब्रेसियर ॲक्सेसरीज हा प्रकार नक्की काय असतो? तो वापरण्याचे फायदे कोणते?

ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम टाळण्यासाठी काय करावे... 

 ब्रेसियर स्ट्रॅप सिंड्रोम टाळण्यासाठी, महिलांनी कोणत्या प्रकारची ब्रेसियर परिधान केली आहे यावर लक्ष देणे गरजेचे आहे. कधीही खूप घट्ट ब्रेसियर घालू नका, कपचा आकार नेहमी लक्षात ठेवा आणि पातळ पट्टा असलेली ब्रेसियर नियमितपणे घालणे टाळा. याशिवाय काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

१. रात्री झोपण्यापूर्वी नेहमी आपली ब्रेसियर काढून मोकळे झोपा.  
२. जेव्हा घरी असाल तेव्हा ब्रेसियर घालणे टाळा.
३. ब्रेसियर घालण्यासाठी आपण शोल्डर पॅड वापरू शकता. याच्या वापराने खांद्यांवर पट्ट्यामुळे होणारे लाल डाग कमी होतील आणि खांदेदुखीचा त्रासही कमी होईल.

४. पाठदुखी किंवा खांदेदुखी टाळण्यासाठी आपण क्रॉस स्ट्रॅप्ड ब्रेसियर घालू शकता. ब्रेसियर निवडताना त्याच्या पट्ट्या बर्‍यापैकी रुंद असतील, याची खात्री करून घ्यावी.  
५. ब्रेसियरच्या कप्सच्या आकाराची विशेष काळजी घ्यावी. स्तनांपेक्षा लहान किंवा मोठ्या आकाराचे कप्स घालणे योग्य नाही. अशा प्रकारे चुकीच्या साइजची  ब्रेसियर घातल्याने आपल्याला तीव्र वेदना होऊ शकतात. 
६. अंडर वायर ब्रेसियर घालणे टाळा. अंडर वायर ब्रेसियर जास्त काळ घातल्याने मज्जातंतूंना इजा होऊ शकते.

Web Title: Is Your Bra Responsible for Chronic Neck, Shoulder and Back Pain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.