रोज रोज आंघोळीचा आळस येतो असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं जाते. अर्थात, लोकांची पहिली प्रतिक्रिया असते 'तो आळशी, घाणेरडा..... तो रोज अंघोळ करत नाही'. एका अहवालात असे म्हटले आहे की केवळ 60% लोक दररोज आंघोळ करतात. याशिवाय इतर लोक रोज आंघोळ करत नाहीत. खर्या अर्थाने, रोज अंघोळी करणं गरजेचं आहे असं अनेकांना वाटतं. तर काहीजण अंघोळीला आणि वैयक्तिक स्वच्छतेला फारसं महत्व देत नाहीत. health.harvard.edu वर याबाबत अधिक माहिती दिली आहे,
रोज अंघोळ करणं गरजेचं आहे का? (Is it necessary to take bath daily)
हार्वर्ड हेल्थ (हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा आरोग्य विभाग) च्या संशोधनानुसार रोज अंघोळ करणं गरजेचं नाही. बहुतेक लोक दररोज आंघोळ करतात कारण ते त्यांच्या नित्यक्रमात समाविष्ट आहे. त्यामुळे शरीराला दुर्गंधी येत नाही आणि ते आरोग्यदायी मानतात. खरं तर, हार्वर्ड विद्यापीठाच्या या अभ्यासानुसार, आरोग्याच्या दृष्टीकोनातून, दररोज आंघोळ करणे देखील आपल्यासाठी हानिकारक आहे.
रोज अंघोळ करण्याचे तोटे (Disadvantages of bathing)
त्वचेमध्ये चांगले बॅक्टेरिया आणि तेल यांचे चांगले संतुलन असते आणि दररोज आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते तसेच ती कोरडी आणि ऍलर्जीक होऊ शकते. बरेच लोक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असणारा, अत्यंत सुगंधी साबण लावतात, ज्यामुळे त्वचेतील सामान्य जीवाणू देखील नष्ट होतात आणि त्वचेतील चांगले बॅक्टेरिया देखील नष्ट होतात. त्वचेची ऍलर्जी बहुतेकदा या गोष्टींमुळे होते. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला सामान्य सूक्ष्मजीवांची सवय आहे आणि अशा परिस्थितीत, दररोज आंघोळ करत असलेल्यांची समस्या अनेक पटींनी वाढते.
किती दिवसांनी अंघोळ करायला हवी? (How many times to take bath in a day)
एका दिवसात एकदा अंघोळ करणे आदर्श मानले जाऊ शकते, परंतु त्याचे तोटे देखील आहेत. उदाहरणार्थ, शरीराच्या दुर्गंधीची समस्या दूर करणं तसेच प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता देखील महत्त्वाची आहे. रोज अंघोळ करणारे चुकीचे करतात असे नाही, एवढेच सांगितले जात आहे की अधूनमधून आंघोळ जरी चुकली तरी त्यासाठी अपराधी वाटण्याची गरज नाही. हिवाळ्यात आवळा खाऊन आजारांना ४ हात लांब ठेवा; वाचा आवळ्याचे जबरदस्त फायदे
किती वेळ अंघोळ करायला हवी? (How much time to take bath)
जर तुम्ही दररोज अंघोळ करत असाल तर जास्तीत जास्त ३-४ मिनिटे अंघोळ करा. तुम्ही प्रायव्हेट पार्ट्स आणि अंडरआर्म्सच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. हा तुमच्यासाठी अधिक सोयीचा पर्याय असू शकतो. केस खूप पातळ, रफ झालेत? चमकदार, लांबसडक केसांसाठी जावेद हबीबनं सांगितला जबरदस्त उपाय