Join us   

जान्हवी कपूरला फूड पॉयझनिंग-दवाखान्यात ॲडमिट, पावसाळ्यात हमखास होणारा फूड पॉयझनिंगचा धोका ‘असा’ टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2024 1:54 PM

Janhvi Kapoor hospitalised due to severe food poisoning : जान्हवी कपूरला फूड पॉयजनिंगचा त्रास; वेळीच लक्षणं ओळखा नाहीतर..

पावसाळ्याचे (Monsoon) दिवस सुरु असताना तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते (Food poisoning). कारण या दिवसात इन्फेक्शनचा धोका वाढतो, आणि फूड पॉयझनिंग होते. नुकतंच बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) देखील फूड पॉयझनिंग झाल्याची माहिती मिळाली आहे (Health Tips). जान्हवी चेन्नईला गेली होती. चेन्नईहून परतताना तिने विमानतळावर काहीतरी खाल्लं. ज्यातून तिला विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, तिचे वडील बोनी कपूर यांनी जान्हवीच्या तब्येतीची माहिती दिली आहे. बोनी कपूर यांनी सांगितले की, तिला गुरुवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, १- २ दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.  दरम्यान, फूड पॉयझनिंग हा नेमका कशामुळे होतो? याची लक्षणं कोणती? अन्नातून विषबाधा होणे म्हणजे काय? पाहूयात(Janhvi Kapoor hospitalised due to severe food poisoning).

अन्नातून विषबाधा होणे म्हणजे काय?

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, अन्नातून विषबाधा होणे ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये विषारी पदार्थ, दुषित अन्न किंवा पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करतात. कच्च्या भाज्या जास्त प्रमाणात खाणे, चुकीच्या पद्धतीने शिजवलेले अन्न, शिळे किंवा फास्ट फूड यामुळेही फूड पॉयझनिंगचा धोका वाढू शकतो.

पावसाळ्यात अन्नामध्ये हानिकारक बॅक्टेरियांमध्ये वाढ होतात. जे पोटात प्रवेश करतात, ज्यामुळे आपण सतत या दिवसात आजारी पडतो.

अन्नातून विषबाधा होण्याची लक्षणं

बैठी जीवनशैलीमुळे वजन घटेना? दुपारच्या जेवणात खा ४ चमचमीत पदार्थ; खाऊन घटवा वजन

पोटदुखी

जुलाब

उलटी

भूक न लागणे

अशक्तपणा

डोकेदुखी

ताप आणि थंडी

फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी काय करावे?

- नेहमी स्वच्छ पाणी प्यावे. आपण विशेष पावसाळ्यात पाणी उकळवून आणि गाळून पिऊ शकता.

- स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

- स्वयंपाक करताना चॉपिंग बोर्ड, चाकू इत्यादी पूर्णपणे स्वच्छ करून त्याचा वापर करा.

- स्वयंपाक करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.

रील स्टार अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू; इन्फ्ल्युएन्सरआधी होती सीए - एक चूक झाली आणि..

- कच्च्या भाज्या आणि फळे नेहमी मिठाच्या पाण्यात धुवून घ्या.

- अन्न नेहमी झाकून ठेवा.

- बाहेरचे, फास्ट फूड खाणं टाळा.

- शिजवलेले अन्न अधिक वेळ फ्रिजमध्ये ठेवू नका. 

टॅग्स : जान्हवी कपूरहेल्थ टिप्स