प्रसिद्ध मोटिव्हेशन स्पिकर जया किशोरी (Jaya Kishori) या लोकांना नेहमीच उपदेश देत असतात. जया किशोरी एक प्रवचनकार आहेत त्यांना कृष्णभक्त म्हटले जाते. त्याचे विचार त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत असतात. जया किशोरी यांचे स्किन केअर रूटीन काय असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. एका व्हायरल व्हिडिओमध्ये जया किशोरी यांनी आपल्या सुंदर त्वचेचं रहस्य सांगितले आहे. ( Jaya kishori Glowing Skin Secret She Applies Home Make Face Pack)
जया किशोरी झोपण्यापूर्वी हा फेसपॅक लावतात
या व्हिडिओमध्ये जया किशोरी सांगतात की ते तीन पदार्थ आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये ठेवतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी जया हळद, बेसन आणि दह्याचा होममेड फेस पॅक चेहऱ्याला लावतात. त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले की हे तिन्ही पदार्थ घरात सहज उपलब्ध होतात. याचा पॅक तयार करणंही खूप सोपं आहे.
जया सांगतात की दिवसभराच्या धावपळीच्या जीवनात त्वचेवर ही पेस्ट लावणं खूपच फायदेशीर ठरते. जया सांगतात की त्यांना लहानपणापासूनच होममेड फेसप्रक लावयला आवडतो. याव्यतिरिक्त त्या ऊन्हापासून चेहऱ्याचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीन आणि मॉईश्चरायजरचा वापर करतात.
हळद, बेसन आणि दह्याचा फेसपॅक कसा तयार करायचा (How To Make Turmeric, Besan And Curd Face pack)
एका वाटीत २ टिस्पून बेसन, एक टिस्पून ताजं दही आणि अर्धा चमचा हळद घ्या. हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर ब्रशने किंवा बोटांनी ही पेस्ट चेहऱ्याला रात्री लावा. जवळपास १५ मिनिटं ही पेस्ट चेहऱ्याला लावून ठेवा. ही पेस्ट सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. या उपायाने चेहऱ्यावर ग्लो येईल आणि पोषणही मिळेल.