Massage Tips For New Born Babies: मसाज किंवा मालिश ही गोष्ट बाळासाठी फार महत्वाची असते. आपल्या पारंपरिक रीतीभातीही बाळाच्या मसाज आणि आंघोळीविषयी फार जागरुक असतात. आईबाबा किंवा प्रेमानं सांभाळणारं कुणीही त्यांनी बाळाला रोज मसाज केला तर बाळाच्या वाढीवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो हे आता अभ्यासांतीही सिद्ध झालं आहे. जॉन्सन ब्रॅण्डही हाच प्रयत्न करतो की रोजची मालिश बाळाला गुटगुटीत ठेवायला मदतच करते. आणि योग्य तेल, योग्य साबण वापरला तर बाळाची त्वचा अतिशय चांगली राहते. बाळाच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होतो.
बाळाला मालिश म्हणजे खरंतर त्याच्याशी स्पर्शानं साधलेला संवादच. बाळाला स्पर्शाची भाषा कळते. प्रेमळ स्पर्श बाळाला सुखावतो आणि बाळाला मजबूतही बनवतो. बाळ किरकिर कमी करतात, शांत राहतात. ज्या बाळांना मायेचे स्पर्श होतात ती बाळं हसतात. होकारे देत गप्पा मारतात. बाळ जन्मत: त्याला आईच्या छातीला लावतात, पोटावर ठेवतात. त्यातून आईचा जो स्पर्श होतो, त्यानं बाळाला सुरक्षित वाटतं. हे स्पर्श आईला आणि बाळाला एकमेकांच्या जास्त जवळ आणतात, भावनिक नातं तयार होतं आणि प्रेम वाढायला लागतं. बाळाला मालिश करताना हे भावनिक नातं अजून घट्ट होतं. याशिवायही मालिशचे काही फायदे आहेत.
* नियमित मालीश बाळाचे रडणे कमी करते.
* तसेच त्याची पचनशक्ती वाढवते, गॅस, बद्धकोष्ठता असे त्रास होत नाहीत.
* चांगली आणि जास्त वेळ झोप लागते.
* बाळाच्या स्नायूंची मजबूती, रक्ताभिसरण, शरीर संवेदना, हातापायांचा समन्वय वाढतो.
* बाळाची प्रतिकार शक्ती वाढते.
* त्याच्या त्वचेचा पोत सुधारतो.
* मालिश केल्यानं आई आणि बाळ दोघांना छान रिलॅक्स वाटतं.
* फक्त बाळ आजारी असल्यास किंवा त्याला नुकतीच लस टोचली असल्यास मालिश करणं टाळावं.
मालिश करायच्या सोप्या युक्त्या
बाळ पूर्णपणे जागं असतं, छान खेळत असतं ती वेळ मालिशसाठी निवडा. बाळ तेव्हा भुकेलं नसावं आणि त्यानं नुकतंच जेवलेलंही नसावं.
बाळाची खोली उबदार असावी पण तिथं अतिप्रकाशही नको.
मालिशला सुरूवात करण्यापूर्वी तेल, टॉवेल, डायपर, कपडे जवळ असले पाहिजेत.
मालिश सुरू करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून हातातील बांगड्या, अंगठ्या काढून ठेवाव्यात.
मालिश करताना बाळ तुमच्या चेहर्याकडे पाहू शकेल अशा पद्धतीने त्याला ठेवा. स्वत: शांत व्हा,मोठ्ठा श्वास घ्या, बाळालाही छान रिलॅक्स होऊ द्या. मग करा सुरुवात.
शास्त्रीय कसोटीवर माईल्ड म्हणून सिद्ध झालेलं तेल, म्हणजे उदाहरणार्थ जॉन्सन्स बेबी ऑईल थोडंस हातावर घ्या. ते बाळाच्या अंगाला लावा. नवजात बाळांच्या मालिशची सुरुवात पायापासून करा. साधारण तिथे मालिश केलेलं बाळांना आवडतं. बाळांना त्यांच्या पायांची मालिश केलेले खूप आवडतं. एका हातानं पाय धरुन दुसऱ्यानं बाळाचे घोटे हळूच पकडा. मग मांडय़ांना गोलाकार मालिश करा. मालिश करत घोट्यापर्यंत या. पुन्हा पुन्हा करा. दोन्ही पायांना अशीच मालिश करा.
मालिशचं महत्व
मालिशमुळे बाळाची संवाद शक्ती वाढत जाते आणि त्याचे विविध भाव तुम्हाला समजू लागतात. त्याच्या आवडीनिवडी, इच्छा, भावना यांची जाणीव मालीशमुळे कळू शकते. बाळाला कधी जवळ घ्यायचं, त्याच्याशी खेळायचं, थोपटायचं हे सारं आपोआप लक्षात येईल. तुमचे आणि बाळाचे नाते अधिक घट्ट होत जाईल. नवजात बाळाला रोज पाच मिनिटं मसाज केला तर त्याला ते आवडतं. दोन महिन्यांच्या बाळाला 20 मिनिटं रोज मालिश करायला हवी. जॉन्सन बेबी प्रोडक्ट्स वापरताना पालकांनाही खात्री असते की बाळाच्या नाजूक त्वचेसाठी ही उत्पादनं सौम्य असल्याचं क्लिनिकली म्हणजेच शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. बाळाची उत्तम काळजी ही सातत्यानं घ्यायची गोष्ट आहे.
Visit for more information: https://bit.ly/3DSPXJL