Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बाळाची पहिली आंघोळ, कशी घ्याल काळजी? बाळासाठी योग्य काय?

बाळाची पहिली आंघोळ, कशी घ्याल काळजी? बाळासाठी योग्य काय?

Johnson’s Baby Soap: सुरुवातीच्या काळात बाळाच्या त्वचेची देखभाल कशी करावी, यासाठी प्रत्येक आईला आणि घरातल्या इतर सदस्यांनाही या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायलाच पाहिजेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2025 14:34 IST2025-02-03T16:23:10+5:302025-02-04T14:34:29+5:30

Johnson’s Baby Soap: सुरुवातीच्या काळात बाळाच्या त्वचेची देखभाल कशी करावी, यासाठी प्रत्येक आईला आणि घरातल्या इतर सदस्यांनाही या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायलाच पाहिजेत..

Johnson’s baby soap that protect your baby’s natural skin moisture from day 1 | बाळाची पहिली आंघोळ, कशी घ्याल काळजी? बाळासाठी योग्य काय?

बाळाची पहिली आंघोळ, कशी घ्याल काळजी? बाळासाठी योग्य काय?

Highlightsजॉन्सन्स बेबी सोपमध्ये व्हिटॅमिन ई योग्य प्रमाणात आहे. त्यामुळेच तर आंघोळीनंतर अगदी दिवसभर बाळाची त्वचा मऊ, मुलायम राहते. अजिबात काेरडी पडत नाही.

नुकतंच जन्मलेल्या बाळाला आपण जेव्हा हातात घेतो तेव्हा त्याच्या नाजुकशा त्वचेचा मऊ- मुलायम स्पर्श आपल्याला हळवं करून टाकतो. अगदी कापसासारखी मऊ असणारी बाळाची त्वचा सुरुवातीच्या काही दिवसांत खूपच कोमल आणि नाजूक असते. ती त्वचा एवढी संवेदनशील असते की एखाद्या जाडसर कपड्यामुळेच काय पण कापसामुळेही ती दुखावली जाऊ शकते. लाल होते. बऱ्याचदा बाळाची त्वचा कोरडी पडून ती एखादा पांढरा पापुद्रा निघावा, अशी दिसते. म्हणूनच बाळाच्या त्वचेची जास्त काळजी घेणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी नेमकं काय करावं, सुरुवातीच्या काळात बाळाच्या त्वचेची देखभाल कशी करावी, यासाठी प्रत्येक आईला आणि घरातल्या इतर सदस्यांनाही या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायलाच पाहिजेत..

नवजात बाळाच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी?

नवजात बाळाला पहिल्यांदा आंघोळ कधी घालावी, आंघोळ घालताना बाळाची कशी काळजी घ्यावी, याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेल्या या काही खास गोष्टी. नव्या आईबाबांना तर खूपच प्रश्न पडतात. आपलं काही चुकलं तर काय अशी भीती वाटते. मात्र काही गोष्टी नीट समजून घेतल्या तर बाळाची आपण योग्य काळजी घेऊ शकतो.

जॉन्सन्स बेबी सोप

१. बाळाला लगेच आंघोळ घालण्याची घाई करू नये. बाळ आणि आई व्यवस्थित स्थिरस्थावर झाल्यावर डॉक्टरांची परवानगी घेऊनच ६ ते २४ तासांनी बाळाला पहिली आंघोळ घालावी, असं इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स सांगतात.

२. बाळाची पहिली आंघोळ अगदी झटपट घालावी. तसेच पाणी आपल्या शरीराच्या तापमानाएवढेच असावे. बाळाच्या त्वचेला त्याचा जराही चटका बसणार नाही, याची काळजी घ्या. कारण सुरुवातीच्या दिवसांत बाळाची त्वचा अतिशय संवेदनशील असते.

३. बाळाच्या नाजूक त्वचेवर कोणतेही हार्ड साबण लावू नये. त्याने बाळाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. म्हणूनच त्यासाठी जॉन्सन्स बेबी सोप हा सौम्य स्वरुपाचा आणि बाळाच्या त्वचेची पुरेपूर काळजी घेणारा साबण तुम्ही वापरू शकता. हे साबण वापरल्यामुळे बाळाच्या त्वचेतले नॅचरल मॉईश्चर अजिबात कमी होत नाही कारण जॉन्सन्स बेबी सोपमध्ये नैसर्गिकरित्या तयार केलेले ग्लिसरीन वापरण्यात आलेले आहे.

जॉन्सन्स बेबी सोप

४. जॉन्सन्स बेबी सोप बाळाच्या त्वचेसाठी अतिशय सौम्य असून हायपोअलर्जनिक आहे. कारण त्यामध्ये पॅराबिन्स, सल्फेट्स, थॅलेट्स तसेच डाईज यासारखे त्वचेसाठी अपायकारक ठरणारे कोणतेही घटक नाहीत, हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे.

जॉन्सन्स बेबी सोप

५. जॉन्सन्स बेबी सोपमध्ये व्हिटॅमिन ई योग्य प्रमाणात आहे. त्यामुळेच तर आंघोळीनंतर अगदी दिवसभर बाळाची त्वचा मऊ, मुलायम राहते. अजिबात काेरडी पडत नाही. बाळाची आई ज्या मायेने बाळाची काळजी घेते, त्याच मायेने जॉन्सन्स बेबी सोपसुद्धा बाळाच्या त्वचेचे संरक्षण करते.

Visit for more information: https://bit.ly/3DSPXJL

Web Title: Johnson’s baby soap that protect your baby’s natural skin moisture from day 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.