Join us   

Joint Pain Relief Tips : पावसाळ्यात गुडघेदुखी, सांधेदुखी वाढलीये? ४ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 11:38 AM

Joint Pain Relief Tips : या ऋतूमध्ये आर्द्रतेमुळे सांधेदुखी सुरू होते. जर आधीपासून सांधेदुखीची समस्या असेल तर ही वेदना आणखी तीव्र होऊ शकते.

एक काळ असा होता की सांधेदुखी हे वयाचे लक्षण असायचे. आजकाल ही समस्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. अनेकदा तरूण वयातील लोकांना सांधेदुखीची तक्रार जावल्याचे तुम्ही ऐकले असेल.  खरं तर, हे तुमच्या म्हातारपणीचं लक्षण नसून असंतुलित जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बैठी दिनचर्या याचं लक्षण आहे. (Ayurveda expert shared tips to get rid of joint and arthritis pain during monsoon)

पावसाळ्यात सांधे का दुखतात?

या ऋतूमध्ये आर्द्रतेमुळे सांधेदुखी सुरू होते. जर आधीपासून सांधेदुखीची समस्या असेल तर ही वेदना आणखी तीव्र होऊ शकते. पावसापूर्वी, बॅरोमेट्रिक दाब कमी होतो आणि यासोबत तुमच्या शरीरावरील हवेचा दाबही कमी होतो, ज्यामुळे सांध्याभोवतीचे स्नायू आणि ऊतींचा विस्तार होतो. यामुळे दबाव वाढल्याने वेदना होतात. (Joint Pain Relief Tips)

पावसात सांधेदुखी कशी कमी करावी?

याचे उत्तर आयुर्वेद डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांच्या इन्स्टा पोस्टवरून मिळते. पावसाळ्याच्या दिवसात सांधे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी काही प्रभावी टिप्स शेअर केल्या आहेत. त्या सांगतात की पावसाळ्यात वातदोषाचा त्रास वाढतो. त्यामुळेच अनेकांना सांधेदुखी, संधिवात, झीज होऊन दुखणे  असे त्रास जावतात. यावर आयुर्वेदिक पद्धती वापरून पाहता येऊ शकते.

आहारात मेथी, हळद आल्याचा समावेश

आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की जर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात सांधेदुखीची तक्रार असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. या दिवसात तुमच्या आहारात मेथी, आले आणि हळद यांचा समावेश करा. तसेच गोड, आंबट, खारट चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका.

तेलानं मालिश केल्यास वेदना कमी होतील

तज्ज्ञ सांगतात की पावसाळ्यातील वेदना कमी करण्यासाठी दररोज कोमट तिळाच्या तेलाने शरीराची मालिश करा. यासोबतच आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा. यामुळे शरीरातील आर्द्रता आणि थंडीचा प्रभाव कमी होतो. यामुळे दुखण्यात खूप आराम मिळतो.

शेवग्याचा पाला घालून चहा? वाढलेली शुगर तर कमी होईलच १० आजार राहतील लांब

गरम जेवण

पावसाळ्याच्या दिवसात आर्द्रतेबरोबरच थोडीशी थंडीही असते ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो. यासोबतच थंड आणि कोरड्या गोष्टी शरीरात वातदोष वाढवण्याचे काम करतात. अशा स्थितीत, तज्ज्ञ शिफारस करतात की गरम अन्न आणि गरम पाणी फक्त पिण्यासाठीच वापरावे. तसेच अन्नामध्ये तूप किंवा तिळाचे तेल घालून शिजवावे.

स्वयंपाक करताना, कुकर लावताना डाळी धुण्याची -भिजत घालण्याची योग्य पद्धत; ४ कुकिंग टिप्स

व्यायाम करा

तज्ज्ञांनी शिफारस केली आहे की हलके व्यायाम ओलाव्यामुळे होणारे वेदना कमी करण्यास मदत करू शकतात. यामध्ये पायऱ्यांचा वापर करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. परंतु अनेकवेळा पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. कारण चालून चालून थकल्यानंही तुम्हाला सांदेदुखी होऊ शकते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य